खरेच चायनीज प्रॉडक्ट बॅन करता येतील का आप ल्याला ?

खरेच चायनीज प्रॉडक्ट बॅन करता येतील का आपल्याला ?

हल्ली ६-७ दिवसांपासून #ChinaProductBan असे संदेश व्हॉटसऍप / सोशल मीडियावर (फॉरवर्ड संदेश) येत आहेत.
काय आहे हे #ChinaProductBan? असा विचार मनात आला, खरेच जर ह्या चीन कडून आयात केलेल्या वस्तूंवर बंदी आणली तर?

माझे मत यावर

माझे विचार कदाचित वेगळे असतील. व ते पटणे थोडे कठीणपण आहे.
जर का आयात – निर्यात यावर बोलायचे म्हटले तर, आपल्या भारताने २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांमध्ये मध्ये चीन देशा कडून एकूण ६१ बिलियन डॉलर च्या वस्तू आयात केल्या आहेत, ६१ बिलियन डॉलर हे भारताच्या एकुण आयातीपैकि १/६ हे चीन कडून होते.
काही वर्षांपूर्वी हेच प्रमाण १/१० इतके होते. आणि निर्यात बद्दल बोलायचे तर भारत देशाने फक्त ९ बिलियन डॉलर इतके सामान निर्यात केले आहे. हे तर अगदी नगण्य आहे. एकूण पाहता हे आयात व निर्यात रक्कम पाहता हा व्यवहार चीनच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.
आपण बराच विचार करतो, व इतरांशी बोलतो तेव्हा सांगतो कि चीनच्या वस्तू वापरू नका, त्या वस्तूंवर बंदी आणा. आणि असे संदेश पण पसरवतो, थोडा विचार करा, आता दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण येतो आहे त्यावेळी दिव्यांची रोषणाई करण्यासाठी चीन मध्ये बनलेल्या वस्तू वापरू नका. चीन कडून आलेली तोरणे विकत घेऊ नका. पण खरेच, आता काय करायचे हा मोठा प्रश्न च आहे, नाही का?
मला तर असे वाटते कि सध्या तरी आपण या प्रश्नापासून स्वतःला काही वेळासाठी दूर ठेवूया. जर का स्मार्टफोन चा विचार केला तर जवळपास सर्वच फोन किंवा त्याचे काही भाग हे चीनमधून निर्यात केलेले आहेत, त्यामुले ते सुद्धा विकत नको घ्यायला, हे तर आपणा सर्वाना समजते आहे.
आपण हि बंदी आणली पाहिजे, कि ज्यामुळे भारताची आर्थिक बाजू बळकट होईल व चीन देशाकडे इतका पैसे जाणार नाही.
इथे एक प्रश्न आजून येतो, तो म्हणजे, आपण चीनच्या वस्तूंवर बंदी आणली तर त्याबदल्यात भारतीय बनावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत का ?

त्याचे उत्तर "नाही" असे आहे, आपण फक्त हा विचार केला कि चीन बनावटीच्या वस्तू वापरू नये, पण माडगं त्या बदल्यात कोणत्या वस्तू वापरायच्या? आपण फक्त डोळे बंद करून #ChinaProductBan असे संदेश व्हॉटसऍप / सोशल मीडिया वर फॉरवर्ड केले, हो ना ?

कधी आपण याचा कोळात जाऊन विचार च नाही केला आता पर्यंत.

खालील वस्तू चीन कडून आयात होतात
१. भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) व त्याचे विविध सुट्टे भाग
२. सौर ऊर्जेचे पॅनल
३. उर्वरक (फर्टीलायझर)
४. वेगवेगळी जड यंत्राची उपकरणे (इक्विपमेंट्स) व त्यांचे सुटते भाग
५. LCD व LED टीव्ही संच
६. खेळणी
७. लाईट
८. विविध विजेच्या (इलेक्ट्रोनिक) वस्तू

आता पुन्हा विचार करा, जर खरेच आपण चीनच्या वस्तूंवर बंदी आणली तर काय होईल?

सध्यपरिस्थिती पाहता चीनकडून निर्यात केलेल्या वस्तूंवर बंदी करणे खूप कठीण आहे

आपण चीन कडून आलेल्या वस्तू भारतीय दुकानातुन घेतो, आता विचार करा या भारतीय विक्रेत्याने त्याच्या दुकानांमध्ये सणासाठी ५ लाख रुपयांच्या चिनी बनावटीच्या वस्तू भरल्या आहेत, आपण भारतीय #ChinaProductBan करतो तर त्या मध्ये कोणाचे नुकसान होईल, चीनचे कि आपल्या भारताचे?

चीन चे व्यापारी तर हे सामान विकून व त्याचे पैसे घेऊन गेले सुध्दा त्यांच्या देशामध्ये परत. आणि हे सर्व चिनी बनावटीचे सामान पूर्ण भारताच्या कोपऱ्यामध्ये विकण्यासाठी पसरले आहे

व जर आपण #ChinaProductBan आज केले तर भारताचे च नुकसान होणार आहे कारण ते सामान भारतातील विक्रेत्यांकडे आहे व व्हीन चे यात काही एक नुकसान होणार नाही आहे. हि गोष्ट कृपया लक्षात घ्या

भ्रमणध्वनी बनवण्यामध्ये मध्ये चीन अग्रेसर आहे, चीन सबत, आपल्याकडे कोरिया, तैवान, जपान, व्हीयेतनाम या सारख्या विदेशांमधून वस्तू आयात होतात व त्या देशांमधून आलेल्या वस्तू आपल्याला चालतील किंवा अमेरिका मधून आलेल्या वस्तू देखील, पण मग चीन च्या का नको? त्या तर इतर देशांमधील वस्तू पेक्षा स्वस्त आहेत ना ? आणि आपण असे ठरवले कि भारत देशात बनलेल्या वस्तूच वापरायच्या तर?

स्मार्ट फोन चे उदाहरण घ्या
भारतीय बनवता मध्ये MicroMax हा फोन आहे
पण खरेच हा फोन संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे का? तर नाही यामधील बरेच शे भाग हे चीन मधून च आयात केलेले आहेत, आपण असे बोलू शकतो कि हा फोन चीन कडून सुटते भाग आणून भारतात बनवला आहे. मग यात कुठे आले #ChinaProductBan

सर्वच वस्तू भारतात विकल्या जातात त्या चीन कडून आलेल्या आहेत. इतकेच काय शाळेच्या वह्या व पेन आणि पेंसिल या सुद्धा चीन कडून च आलेल्या आहेत. मग आता बानी आणायची तर कशा कशावर आणायची?

फक्त विचार करा सकाळ च्या टूथब्रश पाससून ते रात्री झोपण्यासाठी असलेला पलंग व गादि, चहाचा कप ते रात्री वापरणारा काचेचा ग्लास सुद्धा चीन कडून आलेला आहे

आता आपण हे मान्य करायला हवे कि आपण चिनी वस्तूंच्या आहारी गेलो आहोत, #ChinaProductBan करण्यापूर्वी आपण त्या वस्तू ची निर्मिती भारतामध्ये करायला हवी, व त्यानंतर च #ChinaProductBan साठी पुढाकार घ्यायाला हवा असे माझे वैयक्तिक मत आहे.

आपण स्वतःला भारतीय बाजारपेठे मध्ये मजबूत करायला हवे तो पर्यंत तरी #ChinaProductBan करता येणार नाही हि वस्तुस्थिती आहे व आपणा सर्वाना ते मान्य करायला लागेल.

Thanks

Regards

Digamber

Advertisements

Navratri (Nine) colours – 2016

Navratri (Nav-Ratri) – (Nine Night jagran with Devi Naam-japa).

Every year Females of India are excited to know which are the Nine colors to be followed during NavRatri.

Most of (specially Mumbai) females are following colored dresses and excited to wear dresses as per color of the day.

During this NINE days and Tithi names in Sanskrit
Pratipada, Dwitiya, Tritiya, Chaturthi, Panchami, Shasti, Saptami, Ashtami and Navami, [& Dashmi (i.e., known as a Vijaya Dashmi-Dussera)]

Coming to the way of celebrating Navratri festival. This fest on different days has different dress colour codes. These Nine Navratri Colours 2016 are being list below.

You will find many web sites and blogs has wrong information and confustion about the colours for Nine days of navratri. I had found this information in leading Website and i would like to publish here for all of you.

I am sure this information will surely help you to choose right color on each day of Navratri.
• Navratri Day 1 – October 1, 2016 – Ghatasthapana / Pratipada – Grey
• Navratri Day 2 – October 2, 2016 – Dwitiya – Orange
• Navratri Day 3 – October 3, 2016 – Tritiya – White
• Navratri Day 4 – October 4, 2016 – Chaturthi – Red
• Navratri Day 5 – October 5, 2016 – Panchami – Royal Blue
• Navratri Day 6 – October 6, 2016 – Shashti – Yellow
• Navratri Day 7 – October 7, 2016 – Saptami – Green
• Navratri Day 8 – October 8, 2016 – Ashtami – Peacock Green
• Navratri Day 9 – October 9, 2016 – Navami / Dashami / Dussehra – Purple

*Please note: Above days and date for year 2016 only.
Source: https://goo.gl/xBScp2

Navratri (Nine) colours – 2015

Navratri (Nav-Ratri) – (Nine night jagran with Devi naam-japa).

Every year Females of India are excited to know which are the Nine colors to be followed during NavRatri.

Most of (specially Mumbai) females are following colored dresses and excited to wear dresses as per color of the day.

in this NINE days and Tithi names in Sanskrit
Pratipada, Dwitiya, Tritiya, Chaturthi, Panchami, Shasti, Saptami, Ashtami and Navami, [& Dashmi (i.e., known as a Vijaya Dashmi-Dussera)]

During Nine Ratri’ Maa Devi wear Nine different colour’s saree.

You will find many web sites and blogs has wrong information and confustion about the colours for Nine days of navratri. I had found this information in leading newspaper and i would like to publish here for all of you.

I am sure this information will surely help you to choose right color on each day of Navratri.
• Navratri Day 1 – October 13, 2015 – Ghatsthapana – Red
• Navratri Day 2 – October 14, 2015 – Chandra Darshan – Royal Blue
• Navratri Day 3 – October 15, 2015 – Sindoor Tritiya – Yellow
• Navratri Day 4 – October 16, 2015 – Chaturthi – Green
• Navratri Day 5 – October 17, 2015 – Upang Lalita Vrat – Grey
• Navratri Day 6 – October 18, 2015 – Saraswati Awahan in some regions – Orange
• Navratri Day 7 – October 19, 2015 – Saraswati Pooja – Maha Lakshmi Pooja – White
• Navratri Day 8 – October 20, 2015 – Saraswati Pooja ends – Mahashtami – Annapurna Parikrama – Pink
• Navratri Day 9 – October 21, 2015 – Saraswati Visarjan – Maha Navami – Sky Blue

*Please note: Above days and date for year 2015 only.

सुंदर व विलोभनीय भंडारदरा (BhandarDara)

सुंदर व विलोभनीय भंडारदरा

काल भंडारधरा (भंडारदरा / भंडारद-या) येथे जाण्याचा योग आला (योग यासाठी कि, मला हे स्थान फक्त ऐकून माहित होते व मी विचार केला नव्हता कि मी येथे जाईन), दोन दिवसांसाठी गेलो होतो, येताना परत मुंबई ला येऊ नये असे वाटत होते.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे, येथे पावसाळ्यामध्ये भरपूर धबधबे निर्माण होतात त्यामुळे येथे यायचे असेल (व धबधबे पहायचे असल्यास) तर ऑगस्ट हा महीना अगदी योग्य आहे,

पाउस भरपूर पडला असेल व धरण पूर्ण भरले असेल तर १५ ऑगस्टला येथे धरणाचे पाणी सोडतात, त्यावेळी ते पाहण्यासाठी साधारण १ लाखाच्या आसपास पर्यटक येथे येतात. व त्यामुळे ‘वाहतूक कोंडीची समस्या’निर्माण होते त्यामुळे १५ ऑगस्ट ला जाणे, शक्यतो टाळा.

येथील डोंगर दाट धुक्याने भरून गेले होते जणू काही ढग अगदी खाली आले आहेत असेच वाटत होते, त्याचे वर्णन करण्यास नक्कीच शब्द अपुरे पडतील.

पर्यटकांना पाहण्यासाठी येथे बरीच ठिकाणे आहेत, अगदी पर्वणीच आहे, एका दिवसामध्ये सर्व पाहणे शक्य नाही, त्यामुळे २ दिवस तरी मुक्काम होईल असा बेत आखून जा. तरच तुम्ही निसर्गाची अनुभूती घेऊ शकाल, इतका निसर्गाने भरगच्च भरलेला… सुंदर… विलोभनीय… असा हा परिसर आहे.

= + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + =

"निसर्ग सौंदर्याचं अजोड लेणे लाभलेला, हरितक्रांतीची हिरवी झालर ल्यालेला. तपस्वी अगस्ति ऋषी, श्री राम प्रभू, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा अकोले तालुका.येथे आदिवासी लोकांची संख्या अधिक असल्याने आदिवासी तालुका अशी ओळख निर्माण झालेला हा तालुका.
येथे आदिवासींची जमीन फक्त आदिवासीच विकत घेऊ शकतो, त्यामुळे व्यवसायीकरण येथे खूप कमी आहे व यापुढे सुद्धा होईल असे वाटत नाही"

= + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + =

भंडारदरा येथे काय पहाल…

येथील परिसरात भटकंती करताना निसर्गाची मुक्त उधळण पाहताना भान हरपून जाते. काय पहाव… किती पहाव…कुठे फिरावं या विचाराने गोंधळून जायला होते, येथे

– भंडारदरा धरण

– रंधा फॉल (धबधबा) – (हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे)

– अम्ब्रेला फॉल (धबधबा)

– नेकलेस फॉल (धबधबा)

– न्हाणी वाटर (water) फॉल

– साम्रद फॉल (धबधबा)

– कळसूबाई शिखर (पर्वत)

– हरिश्चंद्र गड

– रतनगड

– घाटघर

– घाटघर येथील उदंचन जलविद्युत प्रकल्प

– कोकणकडा

– स्पिल वे

– विल्सन धरण

सांदन पोइंट (सांदनदरी, साम्रद)

– बोटिंग (पावसाळ्या मध्ये बंद असते)

ट्रेकिंग करण्याऱ्यासाठी सुद्धा येथे पर्वणी आहे

येथे अलंग, कुलंग, रतनगड,शिपनेर हे किल्ले आहेत, हो आणि महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई हे सुद्धा येथेच आहे.

कळसुबाईचे शिखराविषयी थोडीशी माहिती

कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.

शिखराची उंची १,६४६ मीटर (५,४०० फूट) आहे .

वर्षाचे बारा हि महिने (अगदी मे महिन्यातसुद्धा) येथे थंडी अनुभवता येते.

छान स्वच्छ निळे आकाश, पर्वतावरून अनेक किल्ल्यांचे दर्शन येथून घेत येते

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर (पर्वत) म्हणजे कळसुबाईचं शिखर! ती मजा या शिखरावर घ्यायची असेल तर केव्हा हि येथे जाउन घेता येते.

ट्रेक करणारे १२ हि महिने येथे येतात, व काही भाविक येथे नवरात्रीच्या वेळेस येतात तेव्हा ते द्रुष्य पाहण्यासारखे असते असे ऐकले आहे.

शिखरावर जाण्यासाठी मुख्य रस्ता हा भंडारदऱ्यापासून ६ किलोमीटरवर असलेल्या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक – इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून साधारण ५८ किलो मीटर वर कळसुबाई पर्वत आहे

पायथ्यापासून शिखरमाथ्यावर पोचायला आपल्यासारख्या माणसांना २.३० ते ३ तास लागतात, गावातील माणसे हेच अंतर १ तासामध्ये पार करतात असे सांगतात.

रंधा धबधबा

भंडारदरा येथून उजव्या हाताला, उत्तरेस साधारण १०-११ कि.मी.अंतरावर प्रवरा नदी चे पाणी १६४ फूट खोल (खाली) दरीत कोसळते, ते ठिकाण म्हणजे रंधा धबधबा होय. येथे नदीक जवळ घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा पाहणे म्हणजे नेत्रसुख आहे, जितके पाहु तितके कमी असे हे विशाल पात्र आहे, निसर्ग किती सुंदर आहे याचा उत्तम नमुना म्हणजे हा धबधबा होय. येथे पर्यटकांसाठी खास सुशोभीकरण करणे सुरु आहे छोटे ब्रिज खास पर्यटकांसाठी बांधले आहे व ते सर्व सिमेंट चा वापर करून बनवले आहेत परुंतु ते पाहताना जणू काही ते लाकडांचा वापर करून बनवले आहे असेच वाटते इतके छान व सुंदर बनवले आहे. जो कोणी कंत्राटदार आहे त्याला सलाम इतके सुंदर काम करत आहेत. त्यासाठी भारत सरकार चे सुद्धा विशेष आभार.

रतनगडावरून उगम झालेली हि प्रवरा नदी, डोंगर दऱ्या पार करत छोटी मोठी वळणे घेत साधारण २० कि.मी.करून अचानक १६४ फुट (५० मीटर) खोल दरीत कोसळते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा होणारा आवाज, पाण्याचा तो शुभ्र धवल रंगाचा झोत, ते निसर्गाचे वैभव यामुळे एक अप्रतिम असे संगीतमय वातावरण अनुभवता येते हा अनुभव अगदी विलक्षण आहे. .

सांदन पोइंट (सांदनदरी, साम्रद)

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हा साम्रद येथे आहे.

काही फोटो

भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ आहे. परंतु त्यामानाने येथे निवास व्यवस्था नाही आहे त्यामुळे तुम्ही जाणार असाल तर अगोदर बुकिंग करून मगच जा, हि विनंती,

गेल्यानंतर तुम्ही निराश होणार नाही हि माझी खात्री आहे, अधिक माहितीसाठी आपण आपली प्रतिक्रिया द्या किवा, मला निरोपावर (digamber3 येथे) लिहा.

वरील काही फोटोसाठी माझे मित्र दिनेश पाटील, अविनाश केणे, राहुल मढवी, अमित निमणकर, रवि यांचे मनपूर्वक आभार

भंडारदरा येथे जाण्यास प्रवृत्त करणारा माझा शालेय मित्र जयेश याचे मनापासून आभार, राहण्याची व्यवस्था याच्यामुळे शक्य झाली, तसेच कुठे जायला हवे काय पहायला हवे याची संपूर्ण माहिती जयेशने दिली.

विकीपेडिया वर सुद्धा माहिती उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी

मी आपला सर्वांचा आभारी आहे. …./….

Sandan Valley – Karoli Ghat

सांदण व्हॅली व करोली घाट

(Sandan Valley – Karoli Ghat)

किल्ल्याची ऊंची : 4000

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: कळसूबाई

जिल्हा : नगर

श्रेणी : अत्यंत कठीण

महाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी अनेक निसर्गलेणी तयार केलेली आहेत. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर ४ महीने कोसळणार्‍या धुवाधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वहातात. त्यांच्या रोरावत जाणार्‍या पाण्यामुळे सह्याद्रीचे कातळ कडे कापले जातात आणि अनेक अजोड निसर्गशिल्प तयार होतात. अशा प्रकारचे निसर्गशिल्प "सांदण" येथे तयार झालेले पहायला मिळते. या ठिकाणी वहाणार्‍या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने लाखो वर्षे कातळकडे तासून त्यातून मार्ग काढलेला आहे. त्यामूळे काही ठिकाणी नदीच्या पात्राची रूंदी 7-8 फूट असूनही वरच्या बाजूचे कातळकडे एकमेकाला जोडलेले आहेत. या निसर्गशिल्पात भर पडलेली आहे ती कातळ भिंतीं मधून तुटून पडणार्‍या खडकांची. उन्हाळ्यात तापलेल्य़ा खडकावर/ कातळभिंतींवर जेंव्हा पावसाचे थंड पाणी पडते, तेंव्हा त्यांना मोठया भेगा पडतात. या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरून त्याच्या रेट्याने मोठ- मोठे खडक कातळभिंतीतून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडतात.हे सर्व घडून येण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात.

Photo coutesy: महाराष्ट्रातीलशिवकालीनगडवकिल्ले

पहाण्याची ठिकाणे :
साम्रद गावातून १० मिनिटात आपण सांदण व्हॅलीत प्रवेश करतो. जस जसे आपण पुढे पुढे जातो तस तसे दोन्ही बाजूंना असणारे कातळकडे जवळ जवळ येऊ लागतात.त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करतांना काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. (पाण्याची खोली ट्रेक कुठल्या महीन्यात करतो त्यावर अवलंबून आहे.) सांदण व्हॅलीच्या या भागात नदीच्या पात्राची सरासरी रुंदी १० फूट तर पात्राच्या दोन्ही बाजूच्या कातळकड्यांची सरासरी उंची १५० फूट आहे. काही ठिकाणी हे कातळकडे वरच्य बाजूस एकमेकाला चिकटलेले आहेत. या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे. रॅपलिंग तंत्राचा वापर करून हा कातळटप्पा पार करावा लागतो. कातळटप्पा ओलांडल्यावर पुन्हा अजस्त्र खडकांची रास आपली वाट पहात असते त्यातून मार्ग काढून उतरतांना २ ठिकाणी ८ ते १० फूटांचे अजस्त्र खडक उतरावे लागतात.

पुढे गेल्यावर एके ठिकाणी अजस्त्र खडकांच्या आडव्या भिंतीने आपली वाट अडवलेली दिसते. या ठिकाणी या दगडांच्या भिंतीवर चढून न जाता दगड एकमेकांवर पडून तयार झालेल्या पोकळीतून उतरत ही भिंत पार करावी लागते. या दगडांमधील पोकळीत एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, सॅक मात्र दोरीने खाली सोडाव्या लागतात. याच्या पुढे पुन्हा एक १५ फूटाचा कातळटप्पा आहे. तो नुसती दोरी लावून उतरता येतो. हा कातळटप्पा पार केल्यावर १० मिनीटात आपण सपाट पृष्ठभागावर येतो. ४-५ तास सतत दगडांच्या राशीतून चालल्यावर सपाट पृष्ठभागावर चालणे म्हणजे स्वर्गसुखच. पुढे एक वळण घेतल्यावर नदी एका खोल डोहात कोसळते. या ठिकाणी असलेल्या सपाट कातळावर रात्रीचा मुक्काम करतात. येथून मागच्या बाजूला बाण सूळका दिसतो. डोहात जाण्यासाठी डोंगर उतरून खाली जावे लागते.

या डोहाच्या पुढे पुन्हा नदीच्या पात्रातून १५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूने एक ओढा नदीच्या पात्रात येऊन मिळतो. या ठिकाणी नदीचे पात्र सोडून ऊजव्या बाजूच्या डोंगरावर चडून गेल्यास आपण "करोली घाटाच्या" मार्गाला लागतो. तर पात्रातून सरळ चालत जाऊन पात्राला समांतर असणार्‍या पायवाटेने चालत गेल्यास २ तासात वोरपड या धनगरवाड्यात पोहोचतो. वोरपडपर्यंत गाडी रस्ता आहे. तर वोरपड पुढील आजोबागडाच्या पायथ्याशी असणार्‍या देहेणे गावात पोहोचण्यास ३० मिनीटे लागतात.

करोली घाट :-
आधी सांगितल्याप्रमाणे सांदण व्हॅली उतरून आल्यावर डोहाच्या पुढे पुन्हा नदीच्या पात्रातून १५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूने एक ओढा नदीच्या पात्रात येऊन मिळतो. या ठिकाणी नदीचे पात्र सोडून ऊजव्या बाजूच्या डोंगरावर चडून गेल्यास आपण "करोली घाटाच्या" मार्गाला लागतो. या घाटाने २ ते ३ तासात साम्रद गावात पोहोचता येते. करोली घाट चढायला सुरूवात केल्यावर उजव्या हाताला हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्याची छोटी आवृती पहायला मिळते. पुढे २ कातळटप्पे चढून गेल्यावर आपण साम्रद गावाच्या पठारावर पोहोचतो. करोली घाट चढतांना मागच्या बाजूस आजोबा डोंगर व सीतेचा पाळणा दिसतो. तर पठारावर आल्यावर रतनगड व खुट्टा सुळका दिसतो. पठारावरून १५ मिनिटात साम्रद गावात पोहोचता येते.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून ३ मार्गांनी सांदण व्हॅलीला जाता येते.

१) मुंबई -नाशिक महामार्गावरील घोटी गाव गाठावे. घोटी – सिन्नर (शिर्डी) रस्त्यावर भंडारदरा फाटा आहे, तेथून भंडारदरा २५ किमीवर आहे. भंडारदर्‍याच्या अलिकडे १ किमी शेंडी गाव आहे. या गावातून उजव्या बाजूचा रस्ता घाटघरला जातो. या रस्त्यावरून शेंडी ते घाटघर कॉलनी अंतर २२ आहे. घाटघर कॉलनीतून डाव्या हाताचा रस्ता २ किमी वरील साम्रद गावात जातो. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, शेंडी गावानंतर लावलेल्या सर्व फलकांवर साम्रद फाटा डावीकडे दाखवलेला आहे. पण डावीकडे न वळता २२ किमीवरील घाटघर कॉलनी पर्यंत सरळ रस्त्यानेच जावे व नंतरच डाव्या बाजूस वळावे. यामार्गे मुंबई ते साम्रद हे अंतर १३४ किमी आहे.

२) मुंबई -नाशिक महामार्गावरील घोटी गाव गाठावे. घोटी सिन्नर (शिर्डी) रस्त्यावर भंडारदराफाटा आहे ,तेथून भंडारदरा २५ किमीवर आहे. भंडारदरा – रतनवाडी – साम्रद हे अंतर २६ किमी आहे. या मार्गे मुंबई ते साम्रद हे अंतर १३६ किमी आहे.

३) मुंबई – कल्याण – आसनगाव ( लोकल ट्रेनने ३५ मिनीटे ) -(रिक्षा/बसने ३ कि.मी) शहापूर -(बसने ३० कि.मी.) डोळ्खांब – (जीपने १२ कि.मी.) -देहेणे. पुढे देहेणेहून वोरपड या धनगरवाड्या पर्यंत चालत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. तिथून करोली घाट मार्गे साम्रद पर्यंत जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

किंवा स्वत:च्या वहानाने मुंबईहून थेट वोरपड गावात जाता येते. एका दिवसात वोरपडहून करोली घाट -साम्रद – सांदण कराण्यासाठी स्वत:च्या वहानाने थेट वोरपड गावात जाणे आवश्यक आहे.

पुण्याहून नारायणगाव – संनमनेर -अकोला – रतनवाडी – मार्गे साम्रदला पोहोचता येते. या मार्गाने पुणे ते साम्रद हे अंतर २२० किमी आहे.

राहाण्याची सोय :
साम्रद गावातील शाळेत व देवळात १० -१० जणांची सोय होते.
सांदण व्हॅलीत मुक्काम डोहाजवळील कातळावर उघड्यावर करावा लागतो.

जेवणाची सोय :
सांदण व्हॅलीत जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
साम्रद गावात आधी कळवल्यास जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :
मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.

जाण्यासाठी लागणारा वेळ : 6-8 taas

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जानेवारी ते मे

सूचना :

१) सांदण व्हॅली हा ट्रेक सोपा व अती कठीण या दोनही प्रकारात करता येतो.
अ) सोप्या प्रकारात साम्रदहून सकाळी निघून सांदण व्हॅलीतील कातळभिंती संपून उतार सुरु होतो तेथे पर्यंत जाऊन परत साम्रद गावात पोहोचावे. या मार्गात पाण्यातून चालाण्याचे थ्रील अनुभवता येते.

ब) अती कठीण प्रकारात साम्रदहून सकाळी निघून सांदण व्हॅलीतील कातळभिंती उतरून पूर्ण व्हॅली पार करतात. यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.

२) सांदण व्हॅली हा १ ते २ दिवसांचा ट्रेक पुढील प्रमाणे करता येतो.
अ) साम्रद – सांदण व्हॅली – करोली घाट – साम्रद
ब) साम्रद – सांदण व्हॅली – वोरपड – देहेणे.
क) देहेणे – वोरपड – करोली घाट – साम्रद – सांदण व्हॅली – वोरपड – देहेणे .

वरील ट्रेक १ दिवसाचा करण्यासाठी गिर्यारोहणात सराईत असलेला छोटा ग्रुप असणे आवश्यक आहे. मोठा ग्रुप असल्यास २ दिवसांचा ट्रेक करावा.

3) सांदण व्हॅलीत मुक्काम डोहाजवळील कातळावर उघड्यावर करावा लागतो.

४) पावसाळा व त्यानंतरचे २ महीने सोडून हा ट्रेक केला जातो. मार्च अखेरपर्यंत काही भागात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे तो भाग पार करण्यासाठी रोपचा वापर करावा लागतो.

५) मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.

६) साम्रद गावात वाटाडे व सामान वाहून नेण्यासाठी माणसे मिळतात. त्यांची मदत आवश्यक असल्यास घ्यावी.

साभार महाराष्ट्रातीलशिवकालीनगडवकिल्ले

Cricket World Cup – Twitter Handle of Pool A and Pool B Team (#CRICKET)

Official Twitter Handles of Pool A and Pool B Team – Cricket World Cup 2015

All world is getting attracted by Social networking, and we love cricket, have prepared the list of Pool A and Pool B team’s official twitter handles.

Hope this will help you to mention the correct Twitter Handle

#Afghanistan Official Twitter Account of #Afghan #Cricket Board – @ACBofficials
#cwc15

#Australia – Official communication @CAComms and The digital news arm working out of #cricket @CricketAus

#Bangladesh – Official Twitter Account of #Bangladesh #Cricket @BCBtigers
#CWC15

#England – Official Twitter Account of #England #cricket @ECB_cricket
#CWC15

#India – Official Twitter Account of $India #Cricket – @BCCI
#cwc15 #bleedBlue

#Ireland – Official Twitter Account of #Ireland #Cricket – @Irelandcricket
#cwc15

#New Zealand – Official Twitter Account of #BLACKCAPS and #NewZealand #Cricket – @BLACKCAPS
#cwc15

#Pakistan – Official Twitter Account of #Pakistan #Cricket Team – @PCB_INFO
#cwc15

#Scotland – Official Twitter Account of #Scotland #Cricket @CricketScotland

#cwc15

#South Africa – Official Twitter Account of #SouthAfrica #Cricket @OfficialCSA
#cwc15

#Sri Lanka – Official Twitter Account of #SriLanka #Cricket @OfficialSLC

#cwc15

#United Arab Emirates – Official Twitter Account of #UAE #Cricket Official – @EmiratesCricket
#cwc15

#West Indies – Official Twitter account of #WestIndies #Cricket Board (#WICB) @westindies
#cwc15

#Zimbabwe – Official Twitter Account of #Zimbabwe #Cricket – @ZimCricketv
#cwc15

Compiled by Digamber

IRCTC apps is available on Google Play now

IRCTC apps is available on Google Play now

http://services.irctc.co.in/beta_htmls/IRCTC_android_App.html

Click to download from Google play https://play.google.com/store/apps/details?id=com.irctc.main&hl=e

Regards
Digamber