ट्विटर कसे वापराल

ट्विटर या सोशल नेटवर्क साईट मध्ये खुप ताकद आहे. तुम्ही ट्विटर वरून जगभरातील मिलियन लोकांना कनेक्ट करू शकता ते.

याचा मुख्य फायदा म्हणजे हे रिअल-टाइम बेस आहे, म्हणजे जे काही घडते ते अगदी सेकंदामध्ये आपल्या समोर ट्विट्स च्या माध्यमातून येते.(आज #रीमालागू यांची दुःखद बातमी घडली आणि लगेच च ती बातमी #ReemaLagoo या हॅशटॅग वर ट्रेंड होऊ लागली )

मी स्वतः ट्विटर, न्यूजसाठी वापरतो. मी कोणते हि न्यूज चॅनेल किंवा TV शो / सिरिअल्स पाहात नाही. सर्व माहिती मला ट्विटर वरून घेता येते. जे हवे ते.

++++++++

ट्विटर कसे वापराल?

मला खात्री आहे, आपण आज हि पोस्ट वाचत आहात म्हणजे तुम्ही तुमचे ट्विटर अकाउंट बनवले आहे व ते का आणि कसे वापरायचे यासाठी हि पोस्ट वाचत आहात.

सर्वीप्रथम तुमचे अभिनंदन, कारण तुम्ही मुख्य काम ट्विटर अकाउंट सुरु करून केले आहे. काही जण तर ट्विटर ऍडिक्ट सुद्धा झाले असतील, परंतु तरी सुदधा ट्विटर कसे वापरायचे हे अजून समजले नाही आहे म्हणून हि ब्लॉग पोस्ट वाचत आहेत.

भेटणारे १०० पैकी ९६ जण सांगतात कि मी फेसबुक, व्हाट्सअँप सराईत पणे वापरतो पण हे ट्विटर काय आहे हेच सजत नाहीय. ट्विटर म्हणजे ट्विट पोस्ट करणे आहे, त्यात वेगळे काय आहे? आणि इतके काय महत्वाचे आहे ते ?

प्रामाणिक पणे, खूप प्रयत्न केला राव, पण हे काय पल्लेच नाही पडत आहे. काही समजेल असे सांगा कि आम्ही पण ट्विटर वापरू शकू.

त्यावेळी मी हसून उत्तर देतो कि, हे काय आहे हे सांगण्या इतके ट्विटर मला सुद्धा अजून समजले नाही आहे, मी सुद्धा एक ट्विटर वापरकर्ता आहे इतरमिलियन युजर्स प्रमाणे. पण तरीसुद्धा मी मला जे सजले आहे ते सांगू शकतो तुम्हाला आणि सुरुवात होते. कसे वापरायचे ते सांगायला

ट्विटर हे संवादाचे साधन आहे आणि ते सुद्धा real time (वास्तविक वेळ) यावर आधारित आहे आणि फक्त ट्विट पोस्ट करणे नाही आहे, तर ट्विटर हे जागतिक स्तरावरील असे प्लॅटफॉर्म आहे जेथे आपण सर्वांशी बोलू शकतो, हवे असलेले प्रश्न विचारू शकतो त्यांची उत्तरे सहज आणिजलदपणे मिळू शकणारे एक ठिकाण म्हणजे ट्विटर.

ट्विटर वापरकर्ते ट्विट्स करतात, ब्रेकिंग न्यूज पोस्ट करतात, तर बरेच जण माहिती पर ट्विट्स करतात काही जण सेलिब्रिटींशी थेट संवाद साधतात.

मी असे बोलेन कि फेसबुक हे मित्र आणि कुटुंब सदस्य यांना जोडणारे किंवा आपण कुठे जातो हे जगाला ओरडून सांगायचे ठिकाण आहे. तर व्हाट्सअँप हे तसेच पण यात privacy आहे. पण ट्विटर मुळी बनवले आहे ते खास वेगळ्या पध्द्तीने ते आपण आधी समजून घेऊ.

आपल्या आवडी प्रमाणे हव्या त्या (देश/ विदेशातील) माणसांना (जे ट्विटर वर आहेत) त्यांना आपण जोडता येण्यासाठी ट्विटर आहे. यात तुमचे मित्र, तुमची मैत्रीण, तुमचा परिवार, तुमचे गाव, तुमचे शहर, तुमचे आवडते खेळाडू, राजकारणी, नट, नटी, इतकेच काय तुम्हाला आवडणारे, युट्यूब चॅनेलसुद्धा येथे ट्विटर वर आहेत, जे तुम्हाला आवडतात ते सर्व काही इकडे आहे. हेच आहे ते कारण ट्विटर वापरण्यासाठी.

चला तर सुरुवात करूया

https://twitter.com/ वर जा

तुमचे नाव व पासवर्ड देऊन लॉगिन करा

लॉगिन झाल्यावर जी स्क्रीन दिसेल, ती समजून घेऊया

१. अपडेट (Edit) Profile / Bio, हेडर आणि डिस्प्ले पिक्टर येथे अद्ययावत करा

२. नोटिफिकेशन बार (यात तुमचे ट्विटर हॅन्डल मेंशन केले ते समजते, हे ई-मेल इनबॉक्स सारखे आहे), तुमचे ट्विट कोणी RT / लाईक केले कि त्याची नोंद येथे मिळते

३. येथे (What’s Happening) तुम्ही ट्विट पोस्ट लिहा

४. तुमच्या आवडीप्रमाणे असलेले ट्विटर वापरकर्ते आहेत असे ट्विटर तुम्हाला सांगते, त्यांचा प्रोफाइल वाचून तुमची इच्छा असल्यास त्यांना फॉलो करू शकता

५. सर्च करणे (हे गूगल सर्च सारखे आहे (येथे तुम्ही ट्विटर user किंवा ट्विट्स चा शोध घेऊ शकता

६. तुमच्या भौगोलिक जागेप्रमाणे ट्रेंड होत असते, ते ट्रेंडिंग होणारे शब्द कोणते आहे हे तुम्हाला समजते, ते तुम्ही तुम्हाला हवे तसे बदलू शकता.

७. टाइम लाईन वर तुम्हाला नवीन येणारे ट्विट्स दिसतात,

८. त्यांच्या फोटो वर क्लिक करून तुम्ही त्यांचा प्रोफाइल पाहू शकता

९. ट्विटला रिप्लाय किंवा RT करू शकता

१०. एकूण ट्विट्स

११. मी फॉलो करत असणारे

१२. माझे फॉलोअर्स

चला तर मग आता सुरु करूया ट्विट्स करायला

होम स्क्रीन वर या आणि करा सुरुवात.

ट्विट कशी पाठवाल

१००-१४० शबद्दल व्यक्त व्हा आणि करा मस्त वाक्य रचना तयार आणि TWEET वर क्लिक करून ट्विट पाठवा

तुम्ही पाठवलेली ट्विट आता ट्विटर च्या सर्व्हर आली असेल ती ट्विट, संपूर्ण जग पाहणार आहे, हेच ट्विटर चे खास वॆशिष्ट्य आहे, जे तुम्हाला whastsapp / फेसबुक ला नाही मिळणार

तुम्ही तुमची ट्विट अशा प्रकारे करा

"मी तुमची ब्लॉग पोस्ट वाचली www.dtawde.wordpress.com @digamber, #म #मराठी "

वरील ट्विट मध्ये जसे लिहिले आहे ते तुम्ही कॉपी करून पेस्ट करून ट्विट केले कि, मला माझ्या ट्विटर नोटिफिकेशन ला ते दिसेल.

समजतें आहे ना कि ट्विट कसे करायचे ते?

छान. तुम्ही लवकरच यात तरबेज व्हाल शुभेच्छा

Please do comments.

ट्विटर – मी कसे शिकलो

ट्विटर बद्दल खूप ऐकून होतो, तुमच्यासारखेच खूप कुतूहल होतेच, परंतु समोर काय होत आहे हेच काही समजत नसायचे तरी सुद्धा देवळातील भक्ताप्रमाणे नियमित हजेरी लावायचो. पण कसले काय समजेल तर ना, बरेच दिवस काही न समजताच गेले. कोणाशी बोलणे नाही कि कि कोणी नवीन फॉलोअर नाही.

ट्विटर वर कोणाचे १०० च्या वर फॉलोअर्स पहिले तरी हेवा (हो हेवाच) वाटायचा. आपले सुद्धा फॉलोअर वाढले पाहिजे असे फक्त वाटायचे, पण त्यासाठी काय करायचे हेच समजायचे नाही. रोज कॉम्पुटर वरून लॉगिन करणे व माझ्या च TL वर वाहत येणारे ट्विट्स वाचणे हा जणू काही माझा छंद च झाला होता. मला ते ट्विट्स वाचनाची सवय झाली होती.

काही दिवसात असे समजले कि ट्विटर वर जास्त फॉलोअर्स असणे सुद्धा आवश्यक आहे तरच आपण केलेले ट्विट्स आपले असणारे फॉलोअर वाचू शकतात कारण ते त्यांच्या TL वर दिसते, म्हणजे आता ट्विट करणे आवश्यक आहे.

सुरुवातीला मी इंग्रजी मध्ये ट्विट्स करू लागलो, १४० अक्षरांचे शब्द जुळवणे सुद्धा खूप कठीण काम आहे हे मला समजायला लागले होते. पण मी शिकत होतो शब्द भांडार तर माझ्याकडे आहे, त्याची जोडणी योग्य पद्धतीने केल्यास १०० अक्षरे सुद्धा खूप आहेत हे नकळत समजले व मी माझे ट्विट्स इंग्रजी या भाषेत १०० अक्षरांसाठी मर्यादित पणे जोडायला शिकलो. हो शिकलो मी, मला खूप आनंद झाला त्यामुळे.

माझे ट्विटर वर टिकून राहण्यासाठी मला ते आवश्यक होते आणि ते मी सहजपणे करू लागलो. आणि बघता बघता माझे १०० ट्विट्स झाले,
जेव्हा ट्विट्स चे शतक झाले त्यावेळी तर मला मी क्रिकेट च्या खेळात शतक केल्यापेक्षा अधिक आनंद झाला.
अगदी मी माझ्या मित्राना (जे ट्विटर वर नाही आहेत) त्यांना फोन करून सांगितले, कदाचित त्य्यांना सुद्धा आनंद झाला असेल (किंवा नसेल सुद्धा, 😦 कारण त्यांना हे ट्विटर प्रकरण समजत नव्हते आणि त्याना ते शिकायचे सुद्धा नाही आहे अजून तरी) पण मी मात्र खुश होतो.

ट्विटर वर फॉलोअर्स कसे येतात किंवा कसे मिळवायचे हे मी आपल्याला पुढील पोस्ट मध्ये सांगतो, तोपर्यंत तुम्ही मला www.twitter.com/Digamber येथे फॉलो करू शकता, तुमचे काही प्रश्न असल्यास येथे विचारल्यास लगेच उत्तरे मिळतील. नवीन पोस्ट साठी जास्त वेळ वाट नाही पाहायला लागणार. आज च रात्री मी पोस्ट करेन त्यात…

मी आता नियमित लिहिणार आहे, खूप काही लिहायचे आहे या ब्लॉग पोस्ट द्वारे शक्य तेव्हढे ज्ञान वाटायचे आहे.

ट्विटर – आहे तरी काय आणि ते कसे शिकायचे ?

ट्विटर आहे तरी काय?

ट्विटर म्हणजे नक्की काय हेच समजत नाही, होय ना ? आपण लॉगिन / साईन अप करतो पण पुढे काय?
भरपूर जणांना फॉलोसुद्धा करतो पण आपल्याला मात्र कोणीच फॉलो बॅक देत नाही, मग काय करायचे ?
ट्विट / फॉलो केलं आता काय?

काही समजत नाही, हो ना ?

सर्वांचे असेच होते सुरुवातीला. हो अगदी माझे सुद्धा असेच झाले होते, मी तर जवळपास ९००+ लोकांना फॉलो केले होते आणि माझे फक्त १५ फॉलोअर्स होते, ते सुद्धा माझे मित्र आणि कार्यालयीन सहकारी होते

काही दिवस नियमित लॉगिन व्हायचो, माझ्या टाइमलाईन (TL) वर दिसणारे ट्विट्स वाचायचो. नवीन नवीन माहिती वाचायला मजा यायची. मी रिट्विट (RT) किंवा ट्विट्स न करता ट्विटर वर खूप वेळ असायचो

बरेच दिवस असेच काही न करता गेले, मग नंतर खूप कंटाळा येत गेला तसे मी ट्विटरवर येणे सुद्धा बंद केले

पुन्हा काहि दिवसांनी चुकून ट्विटरवर अवतरलो तर माझे फॉलोअर्स वाढून ५२ च्या आसपास झाले होते. हे पाहून तर मला आनंद झाला. त्यापासून मी ट्विटरवर नियमित आहे तो अगदी आतापर्यंत

जर तुम्ही माझे ट्विटर फॉलोअर्स, नंबर ऑफ ट्विट्स पहिले तर तुमच्या लक्षात येईल की, मी ट्विटरवर आता चांगलाच मुरलो आहे. बरेच DM समूह सुद्धा तयार झाले, त्यात काही अनोळखी असणारे फॉलोअर्स ओळखीचे झाले
त्यांच्यासोबत भेटी #ट्विटप (#Tweetup) झाल्या , नवीन मित्र व मैत्रिणी जोडल्या गेल्या, इतक्या कि त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट सुद्धा झाली आणि काही सोबत रोज फोनवर बोलणे सुद्धा होते.

एकूण ट्विटर हे मला खूप जवळचे झाले आहे सध्या.

ट्विटर हे एक व्यक्त होण्याचे खूप चांगले साधन आहे, या सोशल नेटवर्किंग साईटमध्ये खूप ताकद आहे, याद्वारे तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्ती / कंपनी सोबत जोडले जाऊ शकता, हवी असलेली खरी माहिती तुम्ही मिळवू शकता, इतकेच काय तुमच्या बँक सोबत तुम्ही तुमच्या तक्रार किंवा तुम्हाला काही माहिती हवी असल्यास ट्विटर वरून घेऊ शकता

तुम्ही वापरात असलेले प्रॉडक्ट खराब झाल्यास थेट कंपनीशी ट्विटर वरून त्याबद्दल कंपनीला कळवू शकता, व तुमचे प्रॉडक्ट बद्दल सेवा घेऊ शकता.
फोन सेवा देणाऱ्या कंपनी बद्दल काही तक्रार असल्यास ती ट्विट द्वारे करू शकता आणि त्याची नोंद / दखल काही क्षणात घेतली जाते. हि आहे ताकद ट्विटर ची.

रेल्वे प्रवास करताना काही त्रास असल्यास रेल्वे ला त्याबद्दल कळवू शकता, आणो रेल्वे तुम्ही असलेल्या गाडीत पुढे येणाऱ्या स्थानकावर तुम्हाला हवी असलेली सेवा देण्यास तयार असेल, हे सर्वे शक्य आहे/ झाले ट्विटर मुळे.

एक दिवस, ट्विटर हेच जग होईल, तुम्ही जोडले आहात का जगासोबत? तुम्ही अधिक माहितीसाठी मला ट्विटर www.twitter.com/Digamber वर फॉलो करू शकता, मी आपणास शक्य तेव्हढी खरी व प्रामाणिक मदत करेण, तुम्हाला ट्विटर शिकवण्यासाठी. परंतु प्रथम तुम्ही या, फॉलो करा, थोडे स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा, त्यात खरी मजा आहे, नाही समजले तर मी आहेच की.

मला असे मनापासून वाटते कि महाराष्ट्रातील प्रत्येक गाव / खेडे गावातील व्यक्ती (मुले / मुली, त्यांचे पालक) यांनी ट्विटर वापरावे, हो ट्विटर अगदी स्प्या भाषेत उपलबध आहे आपल्यासाठी आपण या आणि अनुभवा.

ट्विटर चे काही नियम आहेत जे अधिकृत नाहीत पण ट्विटर युसर्स काढून पाळले जातात, त्याबद्दल मी पुढच्या पोस्ट मध्ये लिहेन