Jio_GigaFiber

Jio GigaFiber साठीरजिस्ट्रेशनसुरुझालेआहे, त्याचाफायदाघ्या

Jio GigaFiber रेजिस्ट्रेशन ची काल १५ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. या हाय स्पीड FTTH (फाइबर टू द होम) ब्रॉडबैंड सेवेचा लाभ घेण्यापूर्वी आपण हे सुद्धा माहिती करून घ्या

Jio GigaFiber कायआहे?

रिलायंस जियो हे हाय स्पीड FTTH (फाइबर टू द होम) ब्रॉडबैंड सेवा आहे. यामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळेल, घरामध्ये ऑप्टिकल फाइबर द्वारे

वापरकर्त्या (यूजर्स) ला 1GB (गीगा बाइट्स) पर सेकेंड्स स्पीड ने इंटरनेट सेवा मिळेल.

Jio GigaFiber साठीरजिस्ट्रेशनकसेकरायचे?

रजिस्टर करण्यासाठी https://gigafiber.jio.com/registration या दुव्यावर जा आणि आपली माहिती भरा

१. ज्या भागात सेवा हवी त्या भागाचे नाव search (शोधा) करा. उदा. मुंबई चा भाग असेल तर मुंबई असे लिहून शोध करा.

२. आपले नाव आणि चालू सेल फोन क्रमांक द्या, काही सेकंदामध्ये OTP पासवर्ड आपल्या फोने मध्ये येईल तो ऍड करा

३. आपला पत्ता द्या

जर आपण जियो चे वापरकर्ते असाल तर आपण हे रेजिस्ट्रेशन My Jio च्या फोन ऍप द्वारे सुद्धा करू शकता.

Jio GigaFiber च्यारजिस्ट्रेशननंतरकितीपैसेभरायलालागणार?

Jio GigaFiber (जियो गीगाफायबर ब्रॉडबँड) प्लान्स रुपये ५०० पासून सुरुवात होते आहे यामध्ये प्रतिमाह अनलिमिटेड डाटा मिळणार आहे, परंतु सध्या तरी रजिस्ट्रेशन साठी कोणते हि शुल्क द्यावे लागणार नाही आहे

सध्या नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता देउन बुक करू शकता.

Jio GigaFiber चेकोणकोणतेप्लान्सआहेत?

प्लॅन१: प्रतिमाह रुपये ५०० – यात वापरकर्त्याला ५० एमबीपीएस चा स्पीड आणि ३० दिवसांसाठी ३०० जीबी डाटा वापरायला मिळेल.

प्लॅन२: प्रतिमाह रुपये ७५० – यात वापरकर्त्याला ५० एमबीपीएस चा स्पीड आणि ३० दिवसांसाठी ४५० जीबी डाटा वापरायला मिळेल.

प्लॅन३: प्रतिमाह रुपये ९९९ – यात वापरकर्त्याला ५० एमबीपीएस चा स्पीड आणि ३० दिवसांसाठी ६०० जीबी डाटा वापरायला मिळेल.

प्लॅन४: प्रतिमाह रुपये १,२९९ – यात वापरकर्त्याला १०० एमबीपीएस चा स्पीड आणि ३० दिवसांसाठी ७५० जीबी डाटा वापरायला मिळेल.

प्लॅन५: प्रतिमाह रुपये १,५०० – यात वापरकर्त्याला १५० एमबीपीएस चा स्पीड आणि ३० दिवसांसाठी ९०० जीबी डाटा वापरायला मिळेल.

Jio GigaFiber भारतामध्येकितीशहरामध्येसुरुहोणारआहे?

रिलायंस जियो ची हाय स्पीड ब्रॉडबैंड सेवा एकाच वेळेस (मैट्रो शहर आणि टीयर २ आणि टीयर ३ शहरे मिळून) १,१०० शहरांमध्ये सुरु होणार आहे

Jio GigaFiber चेहायस्पीडब्रॉडबैंडसेवाकधीपासूनसुरुहोणारआहे ?

जियो गीगा फाइबर चे बुकिंग केल्यावर तुम्हाला त्याचा जोडणी (कनेक्शन) क्रमांक दिला जाईल, परंतु रिलायन्स कडून अजून तारू अधिकृत पणे याची माहिती मिळाली नाही आहे, ज्या शहरामधून जास्तीत जास्त बुकिंग होईल तेथे प्रथम सेवा सुरु होईल.

The end.

[Marathi, Jio GigaFiber हाय स्पीड ब्रॉडबैंड सेवा, Jio GigaFiber मराठी रिट्विट #मराठी, Jio GigaFiber चे प्लान्स, Plan of Jio GigaFiber, Jio GigaFiber internet plans, how to register for Jio GigaFiber, Jio GigaFiber रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन of Jio GigaFiber, Jio GigaFiber registration, registration for internet in India, india internet]

मैफलींची भैरवी – पंडीत भीमसेन जोशी

मैफलींची भैरवी – पंडीत भीमसेन जोशी

वयाच्या १५ व्या वर्षी एक मुलगा फक्त गाणे शिकायचे या प्रेरणे ने घराबाहेर पडतो, गुरू शोधण्यासाठी तो मुलगा दिल्ली, ग्वालियर, फिरत फिरत जलंधरला पोहोचतो आणि तिकडे पोहोचल्यावर त्याला समजते कि आपण ज्या गुरूंना शोधत आहोत ते गुरु आपल्याच गावाजवळील #कुंदगोळ येथे आहे आणि तो मुलगा पुन्हा कुंदगोळला येतो.

तो मुलगा म्हणजे पंडित भीमसेन जोशी,  हाच १५ वर्षाचा मुलगा पुढे सवाई गंधर्वांचा शिष्य बनतो.
गाणे शिकणे किंवा शिष्य बनणे इतके सोप्पे नसते याची अनुभुती भीमसेन जी ना बऱ्याचदा आली कारण त्यांचे गुरु त्याच्या कडून कष्टाची कामे करुन घेत असत.

एके दिवशी भीमसेन जोशींना अंगामध्ये ताप असूनसुद्धा मैलभर लांब चालत जाऊन मोठ्या घागरीतून गुरुंसाठी पाणी आणावे लागत होते आणि पाणी भरल्यानंतर गुरु त्यांना गाणे शिकवत असत. पण ह्या सर्व कष्टानंतरच ‘भीमसेन जोशी’ तयार झालेत. एकेदिवशी सराव करत असताना, चुकीचा स्वर लागल्यामुळे त्याच्या गुरुनि हातात असलेला अडकित्ता फेकून मारला आणि त्याची खूण त्यांच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली. पण ह्याबद्दल काहीही न बोलता, त्यांनी त्यांची गुरुभक्ती कायम ठेवली. असे हे भीमसेन जी जोशी

पुण्याला ९ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवा मध्ये पंडितजी शेवटचे गायले, त्या मैफलीनंतर भीमसेन जी कधी गायले नाहीत. वयाच्या ८६ व्या वर्षी गायलेली त्यांच्या आयुष्यातली शेवटची मैफल, मैफलींची #भैरवी. ही भैरवी अनुभवायची संधी येता येता राहून गेली, त्याची हुरहूर सदैव मनात राहील. या शेवटच्या मैफली मध्ये पंडित भीमसेन जोशी चक्क एक वाक्य बोलले होते – ” मागच्या वर्षी शब्द दिल्याप्रमाणे थोडी संगीताची सेवा करू इच्छितो…

ते किती जमेल काय? मला ते आत्ता सांगता येत नाही… आपण ते ठरवावं.”

आम्ही प्रेक्षक ते ठरवणारे कोण? तुम्हाला ऐकणे हेच आमच्या पिढीचे भाग्य.

त्यांचे youtube वर अभंग ऐकताना नेहमीच अश्रूंचा बांध फुटतो. भीमसेनजींची भैरवी (‘रस के भरे तोरे नैन’) म्हणजे ऐकतच रहावी अशी आहे.

Photo Courtesy: Internet

[Marathi, पंडित भीमसेन जोशी, गंधर्व पुणे, भीमसेन जोशी, अभंग, भैरवी, मैफल, मराठी रिट्विट #मराठी]

एक पाऊल आपल्या माय मराठी साठी

मराठी भाषा पंधरवडा (गूगल भाषांतर दिंडी) २०१८ – शासनाने १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा पंधरवडा घोषित केला आहे
नुसती चर्चा नको तर, तो साजरा करण्यासाठी आपण सारे एकत्र पणे योगदान देऊ या

आपल्याला मराठी भाषा येते ना मग आपण सुद्धा यात सहभागी होऊ शकता, आपल्याला आपल्या मराठी भाषेचे आंतरजालावर अस्तित्व राखण्यासाठी राखण्यासाठी आपण यात सहभागी व्हायला हवे
गूगल भाषांतर दिंडी’ चा उद्देश च हा आहे कि मराठी भाषा वाढली पाहिजे, कित्येक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द कोणता आहे हे आपल्याला माहित नाही, किंवा माहीत आहे आहे परंतु तरी सुद्धा आपण मराठी शब्दा ऐवजी इंग्रजी शब्दांचा सर्रास (नकळत) पणे वापर करतो.
काल पासून सुरु झालेला ‘मराठी भाषा पंधरवडा’ दिनांक १५ जानेवारी पर्यंत साजरा केला जाणार आहे. आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्र मैत्रिणी आणि आपल्या शिक्षक/ शिक्षकांना यात सहभागी होण्यासाठी अवश्य सांगा. हाच योग्य क्षण आहे आम्या माय मराठी ची वेगळ्या पध्धतीने सेवा करण्याची.

अगदी घरात बसून सुद्धा आपण सहजपणे हे करू शकता, १५ जानेवारी दरम्यान रोज नवीन शब्द जोडून आपण आपले योगदान करा, (आपण १५ जानेवारी नंतर सुद्धा केव्हाही शब्द जोडया शकता) आपल्या या छोट्या कृतीमुळे नक्कीच बदल घडेल, उद्यासाठी आपण केलेले योगदांन खूप महत्वपूर्ण आहे. आपण नेहमी तक्रार करतो आणि आता संधी आली आहे, ती वाया घालवू नका

आपण ट्विटर बद्दल ऐकले असेलच, हो ना?
तर ट्विटरवर मराठी भाषा वाढविण्यासाठी काम करणारे बरीचशी मराठी खाती (हॅण्डल्स) उपलब्ध आहेत. प्रत्येक जण अभिनव असे उपक्रम वर्षभर राबवत असतात, यंदाचा ‘मराठी भाषा पंधरवडा’ निमित्त @MarathiWord (आजचा शब्द) यांच्यासोबत ट्विटरवरील नावाजलेले अजून एक खाते @MarathiRT (मराठी रिट्विट) यांनी मराठी भाषिकांना गूगल भाषांतर दिंडी मध्ये सहभागी होण्यासाठी विशेष आवाहन केले आहे.

https://twitter.com/MarathiRT/status/947664900343476224/photo/1?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fpunerispeaks.com%2Fmarathi-bhasha-week%2F

.

https://twitter.com/MarathiWord/status/947666457780928513/photo/1?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fpunerispeaks.com%2Fmarathi-bhasha-week%2F

एक लक्ष नवीन शब्द जोडले जातील अशी अपेक्षा मराठी रिट्विट चे राहुल वेळापुरे यांनी व्यक्त केली आहे. आपण सर्व सहभागी झालो तर दश लक्ष शब्द सहज जोडू शकतो, हो ना ? मग होता आहात ना सहभागी?

यात सहभागी होण्यासाठी आपल्याला संगणक किंवा स्मार्टफोन जी आवश्यकता आहे, आपल्याला जमेल तसा आपण आपला सहभाग नोंदवू शकता.

आपण जर स्मार्टफोन वापरणार असाल तर आपल्या अँड्रॉइड वरून प्ले स्टोअर च्या मध्यमातुन गूगलचे क्राऊडसोर्स नावाचा हा अनुप्रयोग (अॅप) शोधून ते आपल्या फोन मध्ये स्थापित (इन्स्टॉल) करायचे आहे.

(गूगल चे Crowdsource हा नवीन अनुप्रयोग (app) मराठी वापरकर्त्यांना भाषांतर, प्रतिलेखन आणि लिप्यंतरण साठी मदत करण्याचे आवाहन करत आहे).

*आयफोन वापरकर्त्यांसाठी सध्या तरी हा अनुप्रयोग (अॅप) अॅपस्टोअर वर उपलब्ध नाही आहे. 😦

आपण आपल्या मराठी भाषेसाठी जे योगदान करणार आहात त्यासाठी आपल्याला (या कामाच्या बदल्यात) कुठल्याही प्रकारचे बक्षिस किंवा मानधन मिळणार नाही आहे.
आपले योगदान हे संपूर्ण पणे माय मराठीची फक्त सेवा असेल त्याबद्दल आपल्याला कोणताही मोबदला मिळणार नाही आहे. आणि सेवा केल्याचा आनंद हाच मोबदला असेल. 🙂

‘गूगल भाषांतर दिंडी’ आपले बहुमूल्य योगदान देण्यासाठी येथे टिचकी द्या.

प्रतिमा ट्रान्सस्क्रिप्शन करण्यासाठी येथे टिचकी द्या.

#CrowdSource स्थपित केल्यानंतर वापरकर्त्यांना भाषांतराची विनंती हाताळण्याअगोदर अनुमती देण्याआधी त्यांना कोणती भाषा अस्खलित येते आहे, त्याची विचारणा करते, त्यानंतर वापरकर्त्याला प्रतिमा ट्रान्सस्क्रिप्शन, हस्तलेखन ओळख, भाषांतर आणि अनुवाद प्रमाणीकरण तसेच मॅप (नकाशा) भाषांतर यासाठी योगदान देण्यासाठी विनंती करण्यात येते, आपण आपल्या आवडीप्रमाणे आपली निवड करू शकता.

या भाषांतर उपक्रम करण्याचा फायदा असा की गूगलतर्फे आपण केलेल्या एका भाषांतरासाठी एक गुण मिळणार आहे, जेव्हढे जास्त गुण मिळणार तशी आपली पातळी (स्तर) वर वर जात राहणार आहे. आपले जास्त गुण असतील तर आपल्या भाषांतराचे प्रमाणीकरण होण्यास त्याची मदत होईल. आणि आपण केलेले भाषांतर गुगल तर्फे अधिकृतपणे वापरले जाईल.

अधिक माहिती साठी आपण खालील ब्लॉग्स पाहू शकता.
गूगल भाषांतर दिंडी २०१८ ब्लॉग पोस्ट १राहुल वेळापुरे
गूगल भाषांतर दिंडी २०१८ ब्लॉग पोस्ट २दत्ता
गूगल भाषांतर दिंडी २०१८ ब्लॉग पोस्ट ३ पुणेरी स्पीक्स 
गूगल भाषांतर दिंडी २०१८ vlog पोस्ट जीवन कदम 

प्रतिमा सौजन्य : https://goo.gl/t6ZRCN

[Marathi translation, गूगल दिंडी भाषांतर, दिंडी, भाषांतर, मराठी , मराठी आरटी, भाषांतर दिंडी, मराठी भाषांतर दिंडी, भाषांतर मराठी दिंडी, मराठी दिंडी, मराठी भाषा पंधरवडा: दिंडी गूगल भाषांतराची, गूगल भाषांतर दिंडी २०१८ – एक पाऊल मराठी भाषेसाठी, Google Bhashantar Dindi, Google Bhashantar, Google Dindi, Google marathi  Bhashantar Dindi #भाषांतरदिंडी #Twitter मराठीभाषांतरदिंडी, मराठी रिट्विट, राहुल वेळापुरे @MarathiWord, आजचा शब्द @MarathiRT #MarathiWord, #आजचा_शब्द, #MarathiRT Crowdsource  #Crowdsource #मराठी, गूगल भाषांतर दिंडी २०१८ – एक पाऊल मराठी भाषेसाठी]

आधार कार्ड ला लिंक करण्याची मुदत आता तारिख ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली आहे

भारत सरकारने आधार कार्ड ला लिंक करण्याची मुदत आता तारिख ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली आहे

या वाढीव मुदतीमध्ये सर्व वित्तीय-संबंधित सबमिशन समाविष्ट होतील. यामध्ये ;
– आपल्या पॅनकार्ड सोबत आधार क्रमांक जोडणे, दुवा
– आपल्या बँकेमध्ये आधार प्रदान करणे,
– आपल्या विमा पॉलिसीला जोडणे,
– आपले म्युच्युअल फंड,
– शेअर्स,
– पोस्ट ऑफिस स्कीम आणि
– स्टॉक ब्रोकरेज फर्म यासारख्या इतर गोष्टींचा समावेश आहे.
– कर रिटर्न भरण्यासाठी पॅनसह आधार कार्ड जोडण्याची मुदत.
– मोबाइल क्रमांकाशी (सिम) आधार जोडण्याची मुदत
– बँक / वित्तिय संस्थांना आधार विवरण सादर करण्याची अंतिम मुदत

३१ मार्च २०१८ रोजी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार विवरण देण्याची शेवटची तारीख आहे.

SBI Computer Security Day

Please ensure the safety of your bank account while you are using it.

After demonetization, our Indian government (and RBI) is encouraging online transactions and if you look at past few years, the card (and online) transactions have replaced cash transactions at a huge level in all metro cities of India. Most of the salaried people never visit the bank for the banking transactions at all.

Then how they do the transactions? Have they stopped to depositing/ withdrawing money from the bank?

No, they have not stopped transactions at all. They use internet banking for the fund transfers, they use the plastic money (debit/credit card) for shopping.

It is more convenient than carrying cash.

But are we really safe while using the cards or online banking transactions?

People are really not aware about the frauds; there is the danger of many frauds related to internet banking. Many a time this fraud happens because of the negligence of the customer. Here are few tips about how to save your hard earned money and be safe.

While Using Debit Cards:

– ATM card has the ATM security Personal Identification Number (PIN) to make the transactions.

– Do not share PIN with strangers.

– Do not write the PIN on the back of Debit card

– Change the PIN immediately when you first receive the Debit card.

– Avoid PIN simple numbers i.e., 4444 or 1010 or 0606. PIN should be tough numbers like 1605 or any other number which will be tough to guess.

– Do not share your debit card with waiters at restaurants. You ask him to bring the swipe machine at your table for safety purposes.

– Never share your debit card PIN when you shop

– If you are doing online payment with the debit card, please avoid common/ public Wi-Fi usage.

– Restrict the Debit Card’s international usage with your bank portal..

While Doing Internet Banking:

– Do not share the personal credentials with anyone.

– Use the alpha numeric combinations to create a STRONG PASSWORD making it tougher for cyber criminals to crack.

– Change the Password periodically;

– While logging in make sure you have secure browsing with HTTPS

– Register and activate the SMS Alerts for every transaction.

– Do not share the OTP with anyone

– After transaction, make sure you log off from the internet session

– Never leave an incomplete transaction.

Be careful and alert while doing internet transactions or using the Debit card. If you find something fishy, please contact your bank and ask for the help from bank. With this care you can keep your money safe and secure.

Happy Banking!

लवकरच येत आहे झिओमी REDMI NOTE 5A आपल्या भारतात

झिओमी Redmi Note 5A Smartphone हा ऑक्टोबर २०१७ चीन आणि सिंगापूर मध्ये लाँच झाला होता आणि आता लवकरच आपल्या भारतात सुद्धा येत आहे.

– हा एक Dual सिम स्मार्टफोन आहे,
– फोनमध्ये मोठा (५.५ इंच) डिस्प्ले, आपल्याला फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा रियर (सोबत PDAF – फेज डिटेक्शन ऑटोफोकस) कॅमेरासुद्धा मिळत आहे.
– यात खास मायक्रोएसडी कार्ड साठी स्लॉट आहे, त्याच्या सहाय्याने स्टोरेज १२८ GB पर्यंत वाढवता येईल.
– फोनमध्ये Snapdragon 425 quad-core प्रोसेसर हा खूप चांगला परफॉर्मन्स देणार याची शाश्वती देतो.
– फोनमध्ये आपल्याला ३०८० mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. व्हिडिओ बघितल्यास जवळपास ११ तास, गेम्स खेळ्यास १६ तास आणि फोने कॉल वर बोलत असल्यास संपूर्ण बॅटरी संपायला ३५ तास इतका अवधी लागेल
– हा स्मार्टफोन 2 GB रॅमसह येतो.
– फोनमध्ये १६ GB अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.
– आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ह्याचे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवूही शकतो.
– फोनचे आकारमान (मिलीमीटर): उंची १५३; रुंदी ७६.२; जाडी ७.५५
– फोन चे अल्ट्रा थीन बॉडी सोबत एकूण वजन १५० ग्रॅम आहे
– फोने कनेक्टिव्हिटी – GPS, WiFi, HotSpot, Bluetooth,
– फोन कॅमेरा हा Auto Focus, Face Detection, HDR,Geo-tagging, Touch Focus, Digital Zoom, Video Recording सारखे उत्कृष्ट फीचर्स आहेत.

[tags Xiaomi, Xiaomi Note 5A, MI phone, MI smartphone, smartphone, smart phone, midrange smartphone, midrange MI phone, MI dual sim phone, dual sim android phone, android, android smartphone, Android 7.0, MI Mobile)

आयडिया देत आहे ६० जीबी* डेटा मोफत

आयडिया या टेलिकॉम कंपनी ने सोनी इंडिया सोनार भागीदारी केली आहे व ते Sony Xperia R1 आणि Sony Xperia R1 plus (लॉचं २७ ऑक्टोबर २०१७) या फोन खरेदीवर ६० GB चा अधिक डेटा देत आहे

आयडिया फोन ग्राहक जर Sony Xperia R1 किंवा Sony Xperia R1 plus यापैकी कोणताही स्मार्टफ़ोन विकत घेत असेल व सोबत ₹३०० + चा रिचार्जे केल्यास त्या ग्राहकाला 10 GB चा अधिक 4G डेटा मिळेल, म्हणजे या ऑफर मध्ये एकूण 60 GB चा अधिक डेटा सहा महिन्यामध्ये वापरण्यास मिळेल.

या स्मार्टफोन ची पूर्व नोंदणी (प्री बुकिंग) ऍमेझॉन वरून करू शकतो दिनांक १७ नोव्हेंबर रोजी हा फोने उपलब्ध होणार आहे

स्पेसिफिकेशन (विशेषीकरण / specifications )
Xperia R1 – https://www.sonymobile.com/in/products/phones/xperia-r1/specifications/
Sony Xperia R1 plus – https://www.sonymobile.com/in/products/phones/xperia-r1-plus/specifications/

[tags Sony Xperia R1, Sony Xperia R1 plus, sony phone, sony smart phone, midrange smartphone, midrange sony phone, sony dual sim phone, sony dual phone, dual sim android phone, android, android smartphone, Android 7.0, Sony Ericsson Mobile)