चिकन फ्राय

चिकन फ्राय – माझ्या (वेगळ्या) पद्धतीने
पाककला (Recipe) प्रकार: मुख्य जेवण  
पाककृती प्रकार: चिकनचे (कोंबडी) प्रकार – तळलेले चिकन
खाद्यप्रकार (Cuisine): भारतीय 
आहार: मांसाहारी
लागणारा वेळ: 
मसाला मुरण्यास (marinade) लागणारा वेळ: २-२.३० तास (कमीत कमी)
शिजण्यास (cook) लागणारा वेळ: ३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
स्किनलेस चिकन आणि ड्रमस्टिक्स १ किलो
———————————
मसाला मिश्रण (marinade):
———————————
अक्खी वेलची  ५-६
लवंग ५-६
दालचिनी २ (x २ इंच  तुकडे)
मोठे आले (४ इंच) तुकडे
लसूण – ७-८ पाकळ्या
ताजी कोथिंबीर – २ वाट्या भरून
पुदिना – अर्धी वाटी
कडीपत्ता – १५-२० पाने
कमी तिखट – हिरव्या मिरच्या – ५-६
लाल मिरची मसाला – ३ टेबल स्पून (चवीप्रमाणे)
कोथिंबीर (धने) पावडर – २ चमचे
बडीशेप पावडर – २ चमचे
लिंबू रस – १/२ लिंबू
मीठ चवीप्रमाणे
पाणी ४०-८० ml
——————————————————————————
तेला मध्ये तळण्या साठी लागणारे जिन्नस (add into the hot oil):
——————————————————————————
तेल – (deep fry)
अक्खी वेलची  २-३
लवंग – ४-५
तेजपत्ता – २-३ पाने
पुदिना – ८-१० पाने
कडीपत्ता – १२-१५ पाने
—————————————-
डिश सजवण्यासाठी  (to garnish:
—————————————-
कांदे – (आवडीप्रमाणे) कापून घ्या (उभा आणि पातळ)
हिरव्या मिरच्या
कोथिम्बीर
व्हीनेगर  – १-२ चमचे
मीठ
लिंबू
क्रमवार पाककृती: 
१. चिकन भरपूर पाणी वापरून स्वच्छ धुऊन घ्यावे.
Inline images 1
२. सुरीने चिकन कापून घ्यावे, चिकन ला छेद द्यावे. म्हणजे मसाला त्यात चांगला मुरतो Inline images 3
३. वर (मसाला मिश्रण (marinade)) मध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व मसाले मिक्सर मध्ये चांगले वाटून घ्यावे
Inline images 2
Inline images 4
४. वाटलेले मिश्रण चांगले एकत्र करून त्याचा मस्त थर चिकन ला लावावा
Inline images 5
५. थर लावून ते चिकन व्यस्थित झाकून फ्रिज मध्ये थंड करत ठेवून द्यावे २-२.३० तास ठेवावे (शक्य असल्यास रात्रभर तसे ठेवून द्यावे)
Inline images 6
Inline images 7
६. कढई मध्ये थोडे जास्त तेल घेऊन ते गरम करत ठेवावे
Inline images 8
७. तेल चांगले गरम झाल्यावर, तेलामध्ये अक्खी वेलची, लवंग, तेजपत्ता, पुदिना आणि कडीपत्ता टाका
Inline images 9
८. आता मसाला लावून ठेवलेले (मुरलेले) चिकन त्या गरम तेलात टाका, चिकन चे तुकडे अगदी जवळ जवळ नका टाकू थोडे अंतर ठेवा त्यात, गॅस ची गती मंद ठेवा, १०-१२ मिनीटांनी त्यांना पलटी करा जेणे करून ते दोन्ही बाजूने चांगले तळले जातील.
Inline images 10
९. २०-२५ मिनीटांनी चिकन फ्राय तयार
Inline images 11
१०. एका भांड्यात पातळ कापलेले कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिम्बीर, मीठ आणि व्हीनेगर एकत्र करून घ्या त्याने चिकन ला हवे तसे सजावट करून घ्या. तसोबत लिंबू रस टाका आणि मस्त चिकन फ्राय एन्जॉय करा, 🙂 गरम गरम खावे.
Inline images 12
Inline images 13
 
अधिक टिप: 
१ – २ तुकडे तळुन झाल्यावर त्याची चव घेऊन पहा, मीठ कमी असल्यास ते त्यात ऍड करा चांगले मिश्रण करून चिकन फ्राय करा
माहितीचा स्रोत: 
If you enjoyed this, Like or Comment below to let me know on Twitter.
i will be available on twitter.
लेखक (Author) : Digamber
[tags चिकन, मसाला, चिकन फ्राय, चिकन फ्राय कसे बनवायचे?, चिकन फ्राय कसे तयार करायचे, #मराठी, #म, मराठी जेवण माहिती marathi #Marathi, marathi food, food, chicken, chicken fry, chicken masala, how to make chicken fry, easy chicken fry, easy chicken, crispy chicken, non veg, non veg food, gfoodporn, foodie, food blogger ]
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: