ट्विटर – अधिक फॉलोअर्स कसे मिळवायचे

अरे वाह, आज पुन्हा तुम्ही माझ्या ब्लॉग वर उपस्थित आहात, आपल्याला माझ्या ब्लॉग पोस्ट आवडत आहेत हे वाचून आनंद झाला आणि म्हणून च हि पोस्ट तुमच्यासाठी इतक्या लवकर घेऊन आलो आहे.

आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

आज आपण ट्विटर फॉलोअर्स कसे वाढवायचे हे पाहू.

सर्व प्रथम मी असे सांगेन कि आपण आपल्याला जे कोणी नट, न्यूज चॅनेल, खेळाडू, किंवा ओळखीची माणसे आवडतात त्यांना फॉलो करा. त्यानंतर जे चांगले लिहितात त्यांना फॉलो करा,

तुम्ही नवीन आहात जोपर्यंत तुम्ही तुमचे कसब किंवा तुम्ही चांगले वाचनीय ट्विट्स करत नाही तोपर्यंत फॉलोअर येणार नाहीत तुमच्याकडे. पण तुम्ही सर्वाना फॉलो करत रहा, अनफॉलो कोणालाच नका करू कारण एक दिवस तुम्हाला ते फॉलोबॅक नक्की देणार, येथे थोडा जास्त वेळ संयम बाळगा.

व्ययक्तिक फॉलोअर्स वाढण्यासाठी काही बदल आपल्या (प्रोफाइल – BIO) मध्ये करून घ्या

१. तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो DP/AVI म्हणून ठेवा. ज्यामुळे नवीन म्हणून येणारा फॉलोअरला समजेल कि तुमचे हे ट्विटर अकाउंट खरे आहे.

२. ट्विटर BIO मध्ये स्वतःबद्दल लिहा, तुम्ही कोण आहात, काय करता, तुमची आवड काय आहे याबद्दल लिहा, bio लिहिण्यास १४० अक्षरे कमी पडत असतील तर एका ट्विटमध्ये अधिक माहिती लिहा व ते ट्विट Pinned करा (Pinned ट्विट्स च्या अधिक माहितीसाठी मला Digamber फॉलो करून अधिक माहिती विचारू शकता)

३. स्वत:चे लोकेशन जरूर लिहा, कारण यामुळे तुमच्या (लोकेशन ने) जवळ असणारे फॉलोअर वाढतात

४. website मध्ये तुम्ही तुमची website असेल तर ती लिहा किंवा तुमच्याकडे तुमचा लिहीत असलेला ब्लॉग असेल तर त्याचा पत्ता द्या.

त्यानंतर

५. स्वतःचे शब्द जोडून ट्विट्स करत जा. कमीत कमी शब्द जोडून ते लिहा

६. TL वर दिसणाऱ्या ट्विट्स सोबत interaction करा कि ज्यामुळे ट्विट्स करणारी व्यक्ती तुम्हाला ट्विट्स रिप्लाय मुले ओळखू शकेल व फॉलोबॅक देईल.

७. तुमची स्वतःची कल्पनाशक्ती / strategy वापरून खास ट्विट्स तयार करा.

८. माहितीपर ट्विट्स करा, तुम्ही तुमच्या गावात होणारे खास सण व त्याच्याशी संबधित काही फोटो जोडले तर खूप छान

९. ट्विट्स सोबत फोटो असतील तर त्यामुळे रिट्विट मिळण्यास मदत होते

१०. तुम्ही केलेले ट्विट रिट्विट झाले म्हणजे तुमचे ट्विट ज्यांनी रिट्विट केले आहे त्यांच्या TL वर सुद्धा ते तुमच्या नावासहित दिसते.

११. फॉलो करत जा नक्कीच फॉलो बॅक मिळेल जितके फॉलो कराल तितके फॉलोबॅक मिळण्यास चांगले, परंतु विनाकारण अधिक लोकांना फॉलो करणे टाळा

१२. स्वत:ला वेगळेपणे सादर करा

१३. हॅशटॅग कसे ट्रेंड होतात ते समजून घ्या, त्याप्रमाणे आपले ट्विट्स करत जा

१४. तुम्ही जास्तीत – जास्त वेळ कसे उपस्थित राहू शकता ते पहा

१५. तुमच्या अनुपस्थित, ट्विट करण्यासाठी ट्विट schedule साठी मोबाईल अँप वापरू शकता. (ट्विटर किंवा कंमेंट मध्ये मला अधिक माहिती विचारू शकता)

१६. स्वतःचे ट्विटर हॅन्डल नाव सर्वाना सांगा (मित्र / कार्यालयीन सहकारी)

१७. ई-मेल signature मध्ये ट्विटर हॅन्डल ची नोंदणी करा, प्रत्येक ई-मेल सोबत ते जाईल त्यामुळे फॉलोअर वाढतात कारण ते प्रत्यक्ष (किंवा ई-मेल द्वारे) तुम्हाला ओळखत असतात

१८. नियमित ट्विट्स करत जा

१९. Influential users ना फॉलो करा, त्यांच्याशी ट्विट conversation वाढवा, त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स फॉलो करतात

२०. प्रत्येक शुक्रवारी Follow Friday (#FF) मध्ये सहभागी व्हा, त्यामुळे तुम्हाला Follow Friday (#FF) मिळू शकेल

२१. चांगल्या किंवा माहिती पूर्ण ट्विट्स ना रिट्विट करा त्यामुळे फॉलोअर्स वाढतात कारण RT सर्वाना हवे असतात

२२. चांगल्या ट्विट्स ना प्रशंसा करा.

२३. सोशल मीडियावर, वाद न करता संवाद साधा, ते शक्य नसेल तर reply नका देऊ.

२४. ट्विट्स वर प्रश्न विचार, त्यामुळे संभाषण होते, ओळख वाढते

२५. फ्री फ़ॉलोअर्स साठी कोणत्याही वेबसाइट वर लॉगिन नका करू ते काही कामाचे नाहीत, उलट त्या साईट्स स्पॅम आहेत.

२६. काही वेबसाइट फॉलोअर्स विकत देतात,

२७. काही वेबसाइट ट्विटर फॉलो अर्स विकतात. #महत्वाचे फॉलोअर्स विकत घेऊ नका ते काही कामाचे नाहीत, काही दिवसांनी ते अनफॉलो करतात

२८. तुमच्या फॉलोअर्स ना आवडेल अशा ट्विट्स करत जा

२९. ब्लॉग मध्ये ट्विटर हॅन्डल नमूद करा

३०. पुन्हा एकदा सांगेन सातत्य आणि चांगल्या ट्विट content quality हेच फॉलोअर्स मिळण्यासाठी महत्वाचे आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: