Marathi Sonam Gupta Bewafa Hai

मराठी सोनम गुप्ता

#धन्नो हे काल्पनिक पात्र आहे, प्रत्येक स्त्री (पृथ्वी ग्रह असो किंवा परग्रहावरीलअसो) ती, माझ्या दृष्टीने तितकीच महान आहे.

"धन्नो‘ बद्दल सोशल मेडिया वर प्रचंड कुतूहल मिश्रित उत्सुकता असणाऱ्यांसाठी पहिल्यांदाच सांगायला हवं, कि, हि #धन्नो, एक परग्रहा वरील एलियन मुलगी आहे.

या एलियन मुली ला पृथ्वी वरील कोणती हि भाषा येत नाही व तिच्या मध्ये स्वतःची विचार करण्याची शक्ती हि पृथ्वीवरील माणसाइतकी नसल्यामुळे, तिला जे कानावर पडेल ते तिच्या मनात काही वेळा करता राहते,

विमेश शिम्पी यांच्या चित्रपटामधील, रामगढ या गावात, एका मध्यरात्रीच्या वेळी, अचानक एक यान येते त्या यानातुन काही ‘विचित्र’ दिसणारी अशी माणसे पृथीवर उतरतात, ती माणसे इकडे तिकडे फिरत काहींतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात , बराच वेळ कसलातरी शोध सुरु असतो, पहाट होण्यापूर्वी सर्व यानवासी पुन्हा आपल्या यानामध्ये बसून निघून जातात, मात्र त्या यानातील एक मुलगी याना पर्यंत पोहोचण्यापूर्वीच यान पृथ्वीपासून दूर निघून जाते

अशा रीतीने परग्रहावरची एक एलियन (मुलगी) पृथ्वीवर येते, ती ज्या यानाने येते त्या यानाशी तिचा संपर्क तूटतो, व परग्रहवासी मुलगी पृथ्वीवरच राहते, ती यानाशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न करते परंतु पृथ्वीवरून तिचा कोणताही यानाशी संपर्क होत नाही.

आता काय करायचे हा प्रश्न घेऊन ती पहाटे रामगढ मध्ये फिरत असते, इतक्यात तिला एक आवाज ऐकु येतो,

#धंन्नो ए #धन्नो

लगेच ती परग्रहवासी मुलगी लपून बसते, व हळूच पाहते कि काय सुरु आहे ते, तिला दिसते, एक सुंदरशी मुलगी #धन्नो धन्नो करून एका घोडीला खायला चारा देत असते. (या मुलीकडे असे ग्याजेट असते कि ज्या मुळे तिला कोणती हि भाषा काही वेळासाठी अवगत होते, परंतु ती सुद्धा तोडकी मोडकी, त्यामुळे शब्द वेगवेगळ्या प्रकारे उच्चारले जातात)

चारा देता देता त्या सुंदर मुलीचे लक्ष त्या परग्रहवासी मुलीकडे जाते, ती तिला विचारते तू कोण आहेस? तुझे नाव काय आहे ?

परग्रहावरील मुलगी: थोडा विचार करते आणि उत्तर देते कि मी #धन्नो आहे, व तू कोण ?

सुंदर मुलगी: मी बसंती आहे, माझे नाव तर या जगात प्रसिद्ध आहे आणि तुला ते कसे माहित नाही

#धन्नो: मी या जगातील नाही, म्हणून मला माहित नाही. हा हा हा …. माझी भाषा सुद्धा वेगळी आहे

बसंती चारा देता देता तिच्या मोबाइलमध्ये (ट्विटर वर) काहीतरी करत असते. ते पाहून #धन्नो विचारते कि हे काय आहे, तेव्हा बसंती बोलते हा स्मार्ट फोन आहे, आणि त्यात हे जे अँप आहे ते ट्विटर आहे . धन्नो ला त्या ट्विटर चे आकर्षण निर्माण होते,

#धन्नो कडे सुद्धा #Dhanx कंपनीचा एक फोन असतो, परंतु त्यात ट्विटर नसते

बसंती तिला शेअरईट ने ट्विटर अँप शेअर करते, आणि सोबत रामगढ चा वायफाय पासवर्डसुद्धा. रायगढ़ मध्ये आमी आदमीच्या नेत्यानी मोफत वायफाय दिलेला असतो, कधी काधी तो कनेक्ट होत असतो.

बसंती थोडे से ज्ञान सुद्धा देते कि ट्विटर कसे वापरायचे ते.

#धन्नो तशी (खूप) हुशार असते, एकदा सांगितल्यावर तिला ट्विटर कसे वापरायचे ते समजते,

#धन्नो नावाने स्वतःचे एक ट्विटर हॅन्डल बनवते, पण ट्विट काय करायचे कसे करायचे ते तिला समजत नाही. मग काय थोडे कॉपी करून ट्विट करायची हि #धन्नो

असे करता करता हि #धन्नो लय प्रसिद्ध झाली या ट्विटरवर, मराठी, इंग्लिश आणि हिंदी या भाषेत ट्विट करणे सुरु झाले, फॉलोवर्स सुद्धा वाढले. तिचे १ मिलियन फोल्लोवेर्स झाले. कोणी ट्विट बद्दल प्रशंसा केली कि #धन्नो तिच्या स्वतःच्या (तोडक्या) भाषेत आभार मानायची, पण ती भाषा तिच्या ग्रहावरची असायची, त्यामुळे पृथीवरील माणसाना (ट्विटर फोल्लोअर्सना समजायला कठीण होती), पण एक मुलगी ट्विट करते म्हणून भरपूर मुले तीला फोल्लो करत.

#धन्नो आता ट्विटर वर एक सेलेब झाली होती.

कोणी DM केले, आणि काही विचारले कि ती त्याला ब्लॉक करायची. काही दिवसांनी ट्विटर सोबत गूगल आणि फेसबुकबद्दल सुद्धा माहिती मिळाली #धन्नो ला

मग काय आपली #धन्नो सुटली सुसाट (कॉपी, पेस्ट चा घाऊक धंदाच सुरु केला तिने)

कॉपी केलेल्या ट्विट्स वर तिचा स्वतःचा मालकी हक्क सांगत असे, त्यामुळे बरेच फोल्लोअर्स कंटाळले, त्यांनी सांगून पहिले कि हे माझे विचार / शब्द आहेत, तर ती त्या व्यक्तीला ब्लॉक करत असे वर हे शब्द (ट्विट किंवा चारोळी) मीच बनवले आहेत असे सांगे. थोडक्यात चोरी करून शब्द ढापता येतात पण कोणाचे विचार नाहि चोरू शकत हे तिला माहित नव्हते

गूगल, फेसबुक, जेवढे शक्य तेवढे कॉपी अँड पेस्ट करणे झाला एकूण धंदा, त्यात तिने रिलायंस जिओ चे सिम घेतले

मग काय स्लो वायफाय ऐवजी तिला ४G इंटरनेट सुविधा मिळाली त्यामुळे तिला ट्विट करणे अजून सोयीचे पडत होते. आता सर्वाना माहित झाले होते कि हि धन्नो स्वतः चे काही न लिहिता कॉपी पेस्ट करून ट्विट्स करत आहे.

सोशल मेडिया वर १५ नोव्हेंबर ला #SonamGuptaBewafaHai ट्रेंड झाले व #धन्नो ला सर्व जण #मराठीसोनमगुप्ता असे बोलू लागले, जर हिंदी भाषेत #SonamGuptaBewafaHai ट्रेंड होऊ शकते तर #मराठीसोनमगुप्ता सुद्धा ट्रेंड व्हायला पाहिजे म्हणून #मराठीसोनमगुप्ता हा सुद्धा हॅशटॅग #धन्नो सोबत वापरला जाऊ लागला

अचानक एक दिवशी ट्विटर वरून परग्रहा वरील तिच्या लोकांपर्यंत #धन्नो ची माहिती पोहचते एक दिवशी ते यां रामगढ जवळ येते, व त्या एलियन मुली ला पुन्हा घेऊन जाते, आता ट्विटर कोणी #धन्नो किंवा #मराठीसोनमगुप्ता नाही आहे, याची नोंद घ्यावी.

Disclaimer – या पोस्ट मधील सर्व पात्रे संपूर्णतः स्वनिर्मित व काल्पनिक आहेत. फक्त आणि फक्त मनोरंजन हा या पोस्टचा शुद्ध हेतू आहे. पोस्टमधील कोणतेह्या पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तींशी काहीही सबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेत घडणारे प्रसंग माझ्या ऐकण्यात नाहीत किंवा मी त्यांचा पुरस्कारही करीत नाही. हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: