सुंदर व विलोभनीय भंडारदरा (BhandarDara)

सुंदर व विलोभनीय भंडारदरा

काल भंडारधरा (भंडारदरा / भंडारद-या) येथे जाण्याचा योग आला (योग यासाठी कि, मला हे स्थान फक्त ऐकून माहित होते व मी विचार केला नव्हता कि मी येथे जाईन), दोन दिवसांसाठी गेलो होतो, येताना परत मुंबई ला येऊ नये असे वाटत होते.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे, येथे पावसाळ्यामध्ये भरपूर धबधबे निर्माण होतात त्यामुळे येथे यायचे असेल (व धबधबे पहायचे असल्यास) तर ऑगस्ट हा महीना अगदी योग्य आहे,

पाउस भरपूर पडला असेल व धरण पूर्ण भरले असेल तर १५ ऑगस्टला येथे धरणाचे पाणी सोडतात, त्यावेळी ते पाहण्यासाठी साधारण १ लाखाच्या आसपास पर्यटक येथे येतात. व त्यामुळे ‘वाहतूक कोंडीची समस्या’निर्माण होते त्यामुळे १५ ऑगस्ट ला जाणे, शक्यतो टाळा.

येथील डोंगर दाट धुक्याने भरून गेले होते जणू काही ढग अगदी खाली आले आहेत असेच वाटत होते, त्याचे वर्णन करण्यास नक्कीच शब्द अपुरे पडतील.

पर्यटकांना पाहण्यासाठी येथे बरीच ठिकाणे आहेत, अगदी पर्वणीच आहे, एका दिवसामध्ये सर्व पाहणे शक्य नाही, त्यामुळे २ दिवस तरी मुक्काम होईल असा बेत आखून जा. तरच तुम्ही निसर्गाची अनुभूती घेऊ शकाल, इतका निसर्गाने भरगच्च भरलेला… सुंदर… विलोभनीय… असा हा परिसर आहे.

= + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + =

"निसर्ग सौंदर्याचं अजोड लेणे लाभलेला, हरितक्रांतीची हिरवी झालर ल्यालेला. तपस्वी अगस्ति ऋषी, श्री राम प्रभू, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा अकोले तालुका.येथे आदिवासी लोकांची संख्या अधिक असल्याने आदिवासी तालुका अशी ओळख निर्माण झालेला हा तालुका.
येथे आदिवासींची जमीन फक्त आदिवासीच विकत घेऊ शकतो, त्यामुळे व्यवसायीकरण येथे खूप कमी आहे व यापुढे सुद्धा होईल असे वाटत नाही"

= + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + = + =

भंडारदरा येथे काय पहाल…

येथील परिसरात भटकंती करताना निसर्गाची मुक्त उधळण पाहताना भान हरपून जाते. काय पहाव… किती पहाव…कुठे फिरावं या विचाराने गोंधळून जायला होते, येथे

– भंडारदरा धरण

– रंधा फॉल (धबधबा) – (हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे)

– अम्ब्रेला फॉल (धबधबा)

– नेकलेस फॉल (धबधबा)

– न्हाणी वाटर (water) फॉल

– साम्रद फॉल (धबधबा)

– कळसूबाई शिखर (पर्वत)

– हरिश्चंद्र गड

– रतनगड

– घाटघर

– घाटघर येथील उदंचन जलविद्युत प्रकल्प

– कोकणकडा

– स्पिल वे

– विल्सन धरण

सांदन पोइंट (सांदनदरी, साम्रद)

– बोटिंग (पावसाळ्या मध्ये बंद असते)

ट्रेकिंग करण्याऱ्यासाठी सुद्धा येथे पर्वणी आहे

येथे अलंग, कुलंग, रतनगड,शिपनेर हे किल्ले आहेत, हो आणि महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई हे सुद्धा येथेच आहे.

कळसुबाईचे शिखराविषयी थोडीशी माहिती

कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.

शिखराची उंची १,६४६ मीटर (५,४०० फूट) आहे .

वर्षाचे बारा हि महिने (अगदी मे महिन्यातसुद्धा) येथे थंडी अनुभवता येते.

छान स्वच्छ निळे आकाश, पर्वतावरून अनेक किल्ल्यांचे दर्शन येथून घेत येते

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर (पर्वत) म्हणजे कळसुबाईचं शिखर! ती मजा या शिखरावर घ्यायची असेल तर केव्हा हि येथे जाउन घेता येते.

ट्रेक करणारे १२ हि महिने येथे येतात, व काही भाविक येथे नवरात्रीच्या वेळेस येतात तेव्हा ते द्रुष्य पाहण्यासारखे असते असे ऐकले आहे.

शिखरावर जाण्यासाठी मुख्य रस्ता हा भंडारदऱ्यापासून ६ किलोमीटरवर असलेल्या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक – इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून साधारण ५८ किलो मीटर वर कळसुबाई पर्वत आहे

पायथ्यापासून शिखरमाथ्यावर पोचायला आपल्यासारख्या माणसांना २.३० ते ३ तास लागतात, गावातील माणसे हेच अंतर १ तासामध्ये पार करतात असे सांगतात.

रंधा धबधबा

भंडारदरा येथून उजव्या हाताला, उत्तरेस साधारण १०-११ कि.मी.अंतरावर प्रवरा नदी चे पाणी १६४ फूट खोल (खाली) दरीत कोसळते, ते ठिकाण म्हणजे रंधा धबधबा होय. येथे नदीक जवळ घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा पाहणे म्हणजे नेत्रसुख आहे, जितके पाहु तितके कमी असे हे विशाल पात्र आहे, निसर्ग किती सुंदर आहे याचा उत्तम नमुना म्हणजे हा धबधबा होय. येथे पर्यटकांसाठी खास सुशोभीकरण करणे सुरु आहे छोटे ब्रिज खास पर्यटकांसाठी बांधले आहे व ते सर्व सिमेंट चा वापर करून बनवले आहेत परुंतु ते पाहताना जणू काही ते लाकडांचा वापर करून बनवले आहे असेच वाटते इतके छान व सुंदर बनवले आहे. जो कोणी कंत्राटदार आहे त्याला सलाम इतके सुंदर काम करत आहेत. त्यासाठी भारत सरकार चे सुद्धा विशेष आभार.

रतनगडावरून उगम झालेली हि प्रवरा नदी, डोंगर दऱ्या पार करत छोटी मोठी वळणे घेत साधारण २० कि.मी.करून अचानक १६४ फुट (५० मीटर) खोल दरीत कोसळते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा होणारा आवाज, पाण्याचा तो शुभ्र धवल रंगाचा झोत, ते निसर्गाचे वैभव यामुळे एक अप्रतिम असे संगीतमय वातावरण अनुभवता येते हा अनुभव अगदी विलक्षण आहे. .

सांदन पोइंट (सांदनदरी, साम्रद)

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हा साम्रद येथे आहे.

काही फोटो

भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ आहे. परंतु त्यामानाने येथे निवास व्यवस्था नाही आहे त्यामुळे तुम्ही जाणार असाल तर अगोदर बुकिंग करून मगच जा, हि विनंती,

गेल्यानंतर तुम्ही निराश होणार नाही हि माझी खात्री आहे, अधिक माहितीसाठी आपण आपली प्रतिक्रिया द्या किवा, मला निरोपावर (digamber3 येथे) लिहा.

वरील काही फोटोसाठी माझे मित्र दिनेश पाटील, अविनाश केणे, राहुल मढवी, अमित निमणकर, रवि यांचे मनपूर्वक आभार

भंडारदरा येथे जाण्यास प्रवृत्त करणारा माझा शालेय मित्र जयेश याचे मनापासून आभार, राहण्याची व्यवस्था याच्यामुळे शक्य झाली, तसेच कुठे जायला हवे काय पहायला हवे याची संपूर्ण माहिती जयेशने दिली.

विकीपेडिया वर सुद्धा माहिती उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी

मी आपला सर्वांचा आभारी आहे. …./….

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: