झटपट दाखल्यांसाठी आणखी एक ‘सेतू’ – भारत सरकारचा आणखी एक उपक्रम

झटपट दाखल्यांसाठी आणखी एक ‘सेतू’ – भारत सरकारचा आणखी एक उपक्रम

सेतू सुविधेमार्फत उपलब्ध होणारे दाखले

सेतू विषयी थोडेसे

जिल्हा सेतू सुविधा केंद्र, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे दि.18/08/2001 रोजी नागरीकांच्या सोयीसाठी नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. सेतू म्हणजे प्रशासन व सामान्य जनता यांना जोडणारा दुवा होय. यामुळे या सुविधा केंद्रास सेतू असे नांव देण्यात आले. सेवेतून समाधान हे सेतूचे ब्रीद होय. जिल्हा व तालुका मुख्यालयी एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र सेतूची स्थापना करणेबाबत महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन निर्णय क्र.सीओएम 1002/प्र.क्र.240/02/39 दि.23/08/2001 रोजी परिपत्रक काढले. प्रशासनात पारदर्शकता, निपुणता व सातत्य राखणे ही संकल्पना सेतूच्या निर्मितीत आहे. सेतू संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेची महसूल खात्यामार्फत जी कामे होतात, त्यात सुसुत्रता आणून संगणक प्रणालीच्या मदतीने अधिक सुलभ, जलदगतीने व सुबकरित्या एकाच ठिकाणी सेवा देण्यात येतात.

सेतू सुविधा केंद्रामार्फत वितरित होणारे दाखले – – (कागदपत्रे सादर केल्यावरती १५ दिवसात दाखले / दाखला मिळू शकेल).
• उत्पन्नाचा दाखला
• वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला
• जन्म मृत्यु दाखला
• ज्येष्ठ नागरिक दाखला
• स्थानिक वास्तव्याचा दाखला
• जातीचे दाखले
• नॉन क्रिमिलेयर दाखले
• प्रतिज्ञापत्र

सेतू सुविधा केंद्रामार्फत सामान्य जनतेचे होणारे फायदे
• नागरीकांना आवश्यक दाखले एकाच ठिकाणी मिळवून देण्याची व्यवस्था
• अर्जाचे नमुने, न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्‍टॅम्‍प) उपलब्ध करून देण्याची व्यवस्था
• प्रतिज्ञापत्र देण्याची व्यवस्था
• संपूर्ण संगणकीय प्रणालीचा वापर
• चौकशीसाठी स्वतंत्र व्यवस्था
• गतिमान प्रशासन
• सेवेतून समाधान हेच अंतिम उद्धिष्ट

ऑनलाइन सेवा
ठाणे जिल्हयात महसूल प्रशासनामार्फत नागरीकांना जलद सेवा देणेकामी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे.नागरीकांना आवश्यक असणारे दाखल्यांचे नमुने संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.ऑनलाइन

सेवेअंतर्गत सुरूवातीस खालीलप्रमाणे दाखले देण्यात येणार आहेत.
मागील आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखलाअर्जातील माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावे / Click here for applying
मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला (नॉन क्रिमिलेअर कामी) – अर्जातील माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावे / Click here for applying
वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखलाअर्जातील माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावे / Click here for applying
ज्येष्ठ नागरिक दाखला / ओळखपत्रअर्जातील माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावे / Click here for applying
जातीचा दाखला (अ.ज./अ.जा./वि.ज./भ.जा./इ.मा.व./वि.मा.प्र./मराठा) – अर्जातील माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावे / Click here for applying

ठाणे जिल्हयातील सेतू केंद्रात इंटरनेटद्वारे अर्ज करण्याची सुविधा कलेक्टर ठाणे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर दाखला मिळण्यासाठी अर्जाचा नमुना, प्रतिज्ञापत्राचा नमुना व दाखल्यासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांचे माहितीची सूची उपलब्ध करून देणेत आली आहे. सदर संकेतस्थळावर भेट देउन उपलब्ध सेवेचा लाभ घेण्यात यावा.

मुंबई – मी मुंबईकरांना विनती करतो कि तुम्ही ह्या संकेतस्थळाला भेट देऊन संकल्पनेचा लाभ घ्यावा. मुंबई शहर सेतु या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावर दाखला मिळण्यासाठी अर्जाचा नमुना, प्रतिज्ञापत्राचा नमुना व दाखल्यासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांचे माहितीची सूची उपलब्ध करून देणेत आली आहे. सदर संकेतस्थळावर भेट देउन उपलब्ध सेवेचा लाभ घेण्यात यावा.

————————————————————————————————————————

शंका – समाधान

प्र सेतू कार्यालयाच्या वेळा काय आहेत ?
उ अर्ज जमा करण्याची वेळ – सकाळी १०:३० ते दुपारी १:००
दाखला मिळण्याची वेळ – दुपारी २:०० ते ४:००

प्र जेष्ठ नागरिक दाखल्याचा उपयोग काय ?
उ ६० वर्षावरील नागरिकांना शासनाने काही सुविधा दिल्या आहेत. जेष्ठ नागरिक दाखल्यान्व्ये अनेक फायदे उपलब्ध आहेत, जसे रेल्वे प्रवास, विमान प्रवास सवलत, बँक व्याज दर इ.

प्र वास्तव्य दाखल्याचा उपयोग काय ?
उ वास्तव्य दाखला १५ वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना दिला जातो. हा दाखला नागरिकांना कायम वास्तव्यचा पुरावा देतो, तसेच शाळा व कॉलेजच्या प्रवेशासाठी साठी त्याचा उपयोग होतो.

प्र जातीय दाखल्याचा उपयोग काय ?
उ जातीय दाखला हा मागास वर्गीयांसाठी (अ. ज. / अ. जा. / वि. ज. / भा. जा. / इ. मा. व. / वि. मा. प्र.) उपलब्ध करण्यात आला आहे. हा दाखला धारकांना सरकारमान्य विविध संधीचा लाभ घेण्यास मदत करतो
जसे नोकरीची संधी, शासकीय कार्यालायीन बढती इ.

प्र नॉन – क्रिमी लेअर दाखल्याचा उपयोग काय ?
उ हा दाखला मागासवर्गीय लोक, ज्यांचे उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा कमी आहे अशांना दिला जातो. या अन्वये दाखला धारकांना विविध शासकिय संधींचा लाभ घेता येतो.

प्र जेष्ठ नागरिक दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उ जेष्ठ नागरिक दाखल्याला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इथे “क्लीक” करा.

प्र वास्तव्य दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उ वास्तव्य दाखल्याला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इथे “क्लीक” करा.

प्र जातीय दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उ जातीय दाखल्याला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी इथे “क्लीक” करा.

जेष्ठ नागरिक दाखल्या संबंधित प्रश्न.
प्र माझ्याकडे वयाचा पुरावा नाही. मला जेष्ठ नागरिक दाखला कसा मिळू शकेल?
उ कृपया तुमच्या विभागातील कोणत्याही शासकीय इस्पितळात भेट द्या. उ. सेंट जॉर्ज इस्पितळ, जे. जे. इस्पितळ, नायर इस्पितळ, सायन इस्पितळ, ई. या इस्पितळाना तुम्हाला वयाचा दाखला देण्याचा अधिकार आहे. तुमचे लहान आकाराचे फोटो (passport size) सोबत न्यावे.

उत्पन्न दाखल्या संबंधित प्रश्न.
प्र मी एक साधा भाजी विक्रेता / गृहिणी / विधवा आहे. मला उत्पन्न दाखला मिळण्यासाठी कोणते पुरावे द्यावे लागतील?
उ तुम्ही तुमच्या स्थानिक अधिकारी किंवा आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक ई. कडे उत्पन्न दाखल्यासाठी विनंती करू शकता.

उत्पन्न वास्तव्य दाखल्या संबंधित प्रश्न
प्र वास्तव्य दाखल्यासाठी मला नागरिकत्व प्रमाणपत्रकाची आवश्यकता आहे काय?
उ वास्तव्य दाखला १५ वर्षासाठी मिळतो. नागरिकत्वाचे प्रमाणपत्रक आवश्यक आहे. योग्य तो नागरिकत्व दाखला सदर केल्यावरच वास्तव्य दाखला दिला जाईल.

जातीविषय (मागासवर्गीय) दाखल्या संबंधित प्रश्न.
अनुसुचित् जाती-जमाती साठी प्रमाणपत्रक – नागरिकाचे वास्तव्य १०-०८-१९५० पूर्वी किंवा पासून असल्याचा पुरावा दाखविल्यावर मिळू शकते.
विमुक्त / भटक्या जमातीसाठी प्रमाणपत्रक – नागरिकाने त्याचे जातीविषयक तसेच त्याचे वास्तव्य २१-११-१९६४ पूर्वी किंवा पासून असल्याचा पुरावा दाखविल्यावर मिळू शकते.
इतर मागासवर्गीय जमातीसाठी प्रमाणपत्रक – नागरिकाने त्याचे वास्तव्य १३-१०-१९६७ पूर्वी किंवा पासून असल्याचा पुरावा दाखविल्यावर मिळू शकते.
NCL – मागील ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दाखवणे आवश्यक आहे. बेकार असल्यास स्थानिक अधिकाऱ्याकडून पत्रक सदर करावे.

————————————————————————————————————————

शुल्क आकारणी
शुल्क: रुपये १९.५० प्रती अर्ज

————————————————————————————————————————

धन्यवाद, सेवेचा लाभ घ्यावा
आपला,
दिगंबर
digamber@changeindia.in

Advertisements

2 प्रतिसाद

  1. Changala upkram aahe

  2. नवीन सेतु कसे काठावे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: